‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय मोर्चा

‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय मोर्चा
‘म्हैसाळ’साठी शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय मोर्चा

सांगली : ‘म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची थकबाकी टंचाई निधीतून भरावी,’ ‘शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या भाजपचा निषेध असो,’ ‘पाणी आमच्या हक्काचं.. ’अशा घोषणा देत मिरज येथे मंगळवारी (ता. २७) शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय मोर्चा काढला. म्हैसाळ उपसा सिंचन योजना ८ मार्चपर्यंत सुरू केली नाही, तर तीव्र मोर्चा काढू असा इशारा या वेळी शेतकऱ्यांनी दिला.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना मिरज तालुक्‍याच्या पूर्व भागाला आधार आहे. मात्र, ही योजना बंद असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या एक महिन्यापासून उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. शेतात उभी असणारे पीक वाळू लागली आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. टॅंकरला लाखो रुपये खर्च करण्याऐवजी म्हैसाळ योजना सुरू केल्यास पाणी प्रश्‍न सुटणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून योजना सुरू करण्याची मागणी आम्ही करतो आहे, मात्र याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे मागील सर्वच बीले माफ करावे, योजनेची पाणीपट्टीचा बोजा सातबारावर चढविला आहे, तो कमी करून कोरा करावा, १ मार्च २०१८ पासून सोडण्यात येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी रक्कम नियमाप्रमाणे भरू, पाणी वापर संस्था तात्काळ स्थापन करून समान पाणी वाटप करण्यास आम्हास मार्गदर्शन करावे, या मागण्याचे निवेदन मिरज नायब तहसीलदार श्री. सावंत यांना दिले. या मोर्चामध्ये मनोज शिंदे, बी. आर. पाटील, शिवाजी महाडीक, वसंतराव गायकवाड, सिद्धार्थ जाधव, बाळासाहेब होनमोरे यांच्यासह शेतकरी, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, महाराष्ट्र नव निर्माण सेना, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com