औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी निदर्शने

औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी निदर्शने
औरंगाबाद येथे हमीभावाने शेतमाल खरेदीसाठी निदर्शने

औरंगाबाद (प्रतिनिधी) : शेतीमालाची शासनानेच ठरवून दिलेल्या हमीभावाप्रमाणे खरेदी करावी यासह इतर मागण्यांसाठी जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानतर्फे बाजार समितीवर शनिवारी (ता. १७) निदर्शने करण्यात आली. शेतकरी जगला, तर देश जगेल, सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांची लूट थांबवा, अशा घोषणांनी बाजार समिती परिसर दणाणून सोडला. सरकारने ठरविलेला हमी मिळत नसल्याच्या शेतकरी तक्रारी करत आहेत, तुरीचा भाव ५ हजार ४५० ठरवलेला असताना व्यापारी ३८०० ते ४५०० भावाने खरेदी करत असून प्रतिक्‍विंटल नऊशे ते दीड हजाराची लूट केली जात आहे. उशिराने खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापाऱ्यांना कमी भावात तूर द्यावी लागली, शेतकऱ्यांच्या या लूटीस जबाबदार कोण, नोव्हेंबरमध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरू का केले नाही, असे प्रश्‍न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले.  तुरीची प्रतिक्‍विंटल पाच हजार ४५० रुपयांप्रमाणे खरेदी करा, उशिराने तूर खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकऱ्यांची तीन महिने झालेली लूट भरून द्या आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. निदर्शनात हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, डॉ. सुधीर देशमुख, सरचिटणीस देविदास कीर्तीशही यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. निदर्शकांतर्फे बाजार समिती सभापतींना देण्यात आलेल्या निवेदनात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान सरकार किंवा बाजार समितीने भरून देण्याची मागणी केली आहे. तसेच तुरी प्रमाणेच शेतकऱ्यांना इतर शेतीमालाची नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू कराव्यात, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्‍त करा, बाजार समिती हद्दित, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजाणी करा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com