agriculture news in marathi, farmers Agitate on Tur issue in Amaravati | Agrowon

अमरावतीत ‘एसडीओ’ कार्यालयात फेकली तूर
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 एप्रिल 2018

अमरावती : प्रतीकात्मक खरेदी करून ही तूर नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकत सातबारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अभिनव पद्धतीने तूर खरेदी बंदप्रकरणी शासनाचा निषेध करण्यात आला. 

अमरावती : प्रतीकात्मक खरेदी करून ही तूर नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकत सातबारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने अभिनव पद्धतीने तूर खरेदी बंदप्रकरणी शासनाचा निषेध करण्यात आला. 

हमीभावाने तूर खरेदीसाठी सरकारकडून ऑनलाइन नोंदणी करण्यास सांगण्यात  आले. त्यानुसार हजारावर शेतकऱ्यांनी नोंदणी केली. काही शेतकऱ्यांकडील तूर खरेदी केल्यानंतर १८ एप्रिलपासन तूर खरेदी बंद करण्यात आली. शिल्लक आणि ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडील तूर खरेदीचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. याचा विरोध करीत सातबारा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने प्रतिकात्मक तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या ठिकाणी तूर आणलेल्या शेतकऱ्यांच्या तुरीचे वजन केले गेले. त्यानंतर ही तूर उपविभागीय अधिकारी यांच्या कक्षातील टेबलवर फेकून देत शासनाचा निषेध करण्यात आला. 

बोंड अळीग्रस्तांना तत्काळ मदतीचे वाटप, हरभरा खरेदीची गती वाढवावी, रोजगार हमी योजनेतील कामाचे अनुदान मिळावे, कर्जमाफी प्रक्रिया गतीमान करावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या. कर्जमाफीपासून अद्यापही ७० टक्‍के शेतकरी वंचित असल्याने शासनाच्या हेतूवरच या वेळी शंका व्यक्‍त केली गेली. प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात हरिभाऊ मोहोड, भागवत खांडे, राहूल तायडे, किशोर चांगोले, गोपाल महल्ले, वीरेंद्रसिंह जाधव, मंगेश देशमुख, प्रभाकर भुसारी, गणेश कडू यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यात नवती केळीचे दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात नवती केळीचे दर मागील आठवड्यात...
कोल्हापुरात फळांची आवक मंदावली,...कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
कळमणा बाजारात सोयाबीनच्या दरात वाढनागपूर ः सोयाबीनच्या दरात अल्पशी वाढ वगळता कळमणा...
नाशिकला टोमॅटोची आवक वाढली; कांदा,...नाशिक : नाशिक बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोची...
कपाशीतील किडींचे एकात्मिक नियंत्रणसध्या कपाशीचे पीक पाते, फुले व बोंड लागण्याच्या...
सांगली जिल्ह्यात सेंद्रिय शेतमालाला हवी...सांगली जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेतीमाल विक्री...
नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीची वाटचाल...नाशिक जिल्ह्यात सेंद्रिय शेतीचे तीन वर्षांपूर्वी...
नाशिक, निफाड कारखाना भाड्याने देण्याचा...नाशिक : कर्जबाजारी व आर्थिक डबघाईमुळे गेल्या काही...
अकोला, बुलडाण्यात पीक कर्जवाटप ३०...अकोला  ः शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीक...
गोंदियातील कृषी सेवा केंद्रे लावणार...गोंदिया   ः जमिनीची गरज ओळखूनच खताची मात्रा...
साताऱ्यात पावसाअभावी पिके करपू लागलीसातारा  : जिल्ह्यात सुमारे एक महिन्यापासून...
नगर जिल्ह्यात पावसाअभावी कांदा लागवड...नगर  ः जिल्हाभरात पावसाअभावी कांदालागवड...
वाशीममध्ये रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...वाशीम  ः या हंगामात जिल्ह्यात चांगला पाऊस...
खरेदी केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी...सातारा  : शेतीमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू...
संघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...
'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...
जालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...
शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...
खानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...
पुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे  : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...