तूर खरेदी मुदतवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

तूर खरेदी मुदतवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या
तूर खरेदी मुदतवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चा ठिय्या

परभणी : तूर खरेदीसाठी मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी सोमवारी (ता. १४) स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांच्या दालनात तूर फेकून देत ठिय्या आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील १७ हजार ४५० शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केलेली असताना आजवर ४,३७६ शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे १३ जार ७४ शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे शिल्लक आहे. परंतु मंगळवारी (ता. १५) तूर खरेदी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे नोंदणी केलेल्या, परंतु मोजमाप न झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यासाठी मुदत वाढ द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, दिगंबर पवार, शेख जाफर, केशव आरमळ, रामेश्वर आवरगंड, गजानन गरुड, रामकिशन गरुड, बालासाहेब ढगे, बालाजी मोहिते आदींनी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) गणेश पुरी यांच्या दालनात तूर फेकून ठिय्या आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com