राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जेल भरो आंदोलन

राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जेल भरो आंदोलन
राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर जेल भरो आंदोलन

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत सरकारने फसविले, शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर दहा रुपयांचा तोटा आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, भावनिक व जाती-धर्माचा मुद्दा उपस्थित करून सरकार जनतेचे लक्ष विचलित करीत आहे. याचा जाब विचारत राज्य शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीतर्फे सोमवारी(ता. १४) जेल भरो आंदोलन करण्यात आले.  आंदोलकांनी बैलगाडी घेऊनच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला. घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला. शासनाने कर्जमाफीबाबत निकष व अटी लावून कर्जमाफीऐवजी सरसकट कर्जमाफी करणे टाळले. दीड लाखापर्यंतची कर्जमाफीची अंमलबजावणी सरकारला करता आली नाही. कर्जमाफी हा कायमस्वरूपी उपाय नाही. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक ५० टक्के नफा या सूत्राप्रमाणे शेतीमालाचा भाव ठरविणे आवश्‍यक आहे. असे असतानाही सरकार या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. याचा शोतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी निषेध केला.  आंदोलनात माजी आमदार संपतबापू पवार नामदेव गावडे  रघुनाथ कांबळे, बाबासाहेब देवकर केरबा पाटील, बाबूराव कदम, सुवर्णा तळेकर, बी. एल. बरगे, संताराम पाटील आदिंनी सहभाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com