Agriculture News in Marathi, farmers agitation, Buldhana district | Agrowon

बुलडाण्यात प्रहार संघटनेचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

बुलडाणा (प्रतिनिधी) ः शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा, बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या जनशक्ती पक्षाने गुरुवारी (ता. 7) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातबारा कोरा करा आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांसह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार राज्यभरात सातबारा कोरा करा, हे आंदोलन करण्यात आले.

बुलडाणा (प्रतिनिधी) ः शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करुन सातबारा कोरा करावा, बोंड अळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 25 हजार रुपयांची मदत देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या जनशक्ती पक्षाने गुरुवारी (ता. 7) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातबारा कोरा करा आंदोलन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांसह शेकडो प्रहार कार्यकर्त्यांनी शासन विरोधी घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या आदेशानुसार राज्यभरात सातबारा कोरा करा, हे आंदोलन करण्यात आले.

त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांच्या नेतृत्वात उपजिल्हाप्रमुख नीलेश गुजर, अजय टप, प्रहार विद्यार्थी संघटनेचे अक्षय राऊत, बुलडाणा तालुकाप्रमुख प्रदीप टाकसाळ, मलकापूर तालुका प्रमुख पंकज जंगले, नांदुरा तालुकाप्रमुख रामेश्वर काटे यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. या वेळी शासनविरोधी घोषणाबाजी करीत तब्बल तासभर निदर्शने करण्यात आली.

तसेच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून सातबारा कोरा करण्यात यावा, बोंड अळीने उद्‌ध्वस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना विनाअट एकरी 25 हजार मदत देण्यात यावी, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे, शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे वीजबिल माफ करून 24 तास वीजपुरवठा देण्यात यावा, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये अनुदान देण्यात यावे, स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, पेरणी ते कापणीच्या कामाचा मनरेगात समावेश करण्यात यावा, शेतमालाला आधारभूत भाव द्यावा, कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला.

या वेळी शेषराव सोनुने, समाधान जाधव, रामेश्वर ठाकरे, आशिष उबाळे, स्वप्नील साखळे, सुनील उगले, प्रवीण चाटे, विष्णू देवकर, राहुल लोखंडे,
विकास दांडगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...