agriculture news in Marathi, Farmers agitation for compensation, Maharashtra | Agrowon

नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको
टीम अॅग्रोवन
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

नागपूर ः गारपीट, वादळ तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई मार्गावरील खापरी बोरोकार येथे मंगळवारी (ता. १३) रास्ता रोको केला. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी अखेरीस रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला. 

नागपूर ः गारपीट, वादळ तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, याकरिता शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई मार्गावरील खापरी बोरोकार येथे मंगळवारी (ता. १३) रास्ता रोको केला. प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त शेतकऱ्यांनी अखेरीस रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध केला. 

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात आमदार आशिष देशमुख यांनी सहभागी होत आपले समर्थन दिले. सोमवारी (ता.१२) सायंकाळी खापरी बोरोकारसह अनेक गावांमध्ये झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. गहू झोपला त्यासोबतच सोंगून ठेवलेल्या हरभरा पिकालादेखील फटका बसला. या नुकसानीपोटी मिळणारी मदत कर्जमाफीप्रमाणे ठरू नये, अशी मागणी शेतकऱ्यांची होती. तत्काळ पंचनामे करून मदत मिळावी, यासाठी शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर-मुंबई मार्गावर रास्ता रोको केला. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी त्यानंतर रस्त्यावर टायर जाळत निषेध केला. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठले. परंतु आंदोलनकर्ते त्यांना जुमानत नव्हते. 

कारंजा तालुक्‍यातही आंदोलन
वर्धा जिल्ह्याच्या कारंजा तालुक्‍यातील हेटीकुंडी फाट्यावर सकाळी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. या वेळी शिवसेना खासदार आनंदराव आडसूळ यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. सरकारने एका महिन्याच्या आत गारपीटग्रस्तांना मदत दिली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. 

पालकमंत्र्यांनी केली पाहणी
नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील अनेक गारपीटग्रस्त गावांना भेटी दिल्या. या वेळी त्यांनी सर्वेक्षण व पंचनामे करून तत्काळ मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...