agriculture news in marathi, Farmers agitation for loanwaiver, Kangaon, Pune | Agrowon

कानगावात शेतकरी संपावर, केले अर्ध नग्न आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017
वरवंड, जि. पुणे : कानगाव (ता.दौंड)येथे शेतकरऱयांनी पुकारलेल्या राज्यव्यापी शेतकरी आक्रोश आंदोलन-संपाकडे शासन डोळेझाक करीत असल्याच्या पाश्वभुमीवर शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात चांगलाच एल्गार केला. शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बोंबा-बोंब करीत अर्ध नग्न आंदोलन केले.
वरवंड, जि. पुणे : कानगाव (ता.दौंड)येथे शेतकरऱयांनी पुकारलेल्या राज्यव्यापी शेतकरी आक्रोश आंदोलन-संपाकडे शासन डोळेझाक करीत असल्याच्या पाश्वभुमीवर शेतकऱ्यांनी शासनाच्या विरोधात चांगलाच एल्गार केला. शासनाचे लक्ष वेधुन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी बोंबा-बोंब करीत अर्ध नग्न आंदोलन केले.

शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमाफी आणि शेती संदर्भातील विविध मागण्यांसाठी कानगाव येथे शेतकऱ्यांचे शेतकरी आक्रोश आंदोलन व चक्री उपोषण सुरु आहे. काल (सोमवारी) आंदोलनास पाच दिवस झाले आहेत. या दरम्यान, जिल्हा व इतर जिल्ह्यातुन १२० गावांनी आंदोलन व संपाला पाठींबा दिला आहे.तालुक्यासह इतर तालुक्यातील विविध पक्षाच्या दिग्ज नेत्यांनी आंदोलनाला भेट देवुन पाठींबा दिला आहे. मात्र, सरकार शेतकऱयांच्या संबधीत मागण्यांकडे साइस्कर डोळेझाक करीत असल्याचा आरोप आंदोलक शेतकरी करु लागले आहे. परिणामी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन व संप करीत आहेत.सोमवारी शेतकऱ्यांनी चांगलाच एल्गार केला.

विठ्ल मंदिरात आंदोलकांनी दुपारी बारा वाजता चक्क अर्ध नग्न आंदोलन केले.यावेळी बोंबा-बोंब करीत सरकारच्या शेती विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.आंदोलनात तरुणांसह,जेष्ठांची मोठी संख्या होती.माऊली शेळके,सरपंच संपत फडके यांनी घोषणा बाजी करीत मागण्या मांडल्या.

यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.दरम्यान,यावेळी शेतकरी आक्रोश कृती समितीचे सदस्य भानुदास शिंदे म्हणाले, शेती संदर्भातील विविध मागण्यासाठी गेली पाच दिवसापासुन शेतकऱयांचे आंदोलन सुरु आहे. मात्र, सरकार दखल घेत नाही. आता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलनाची तिव्रता लवकरच वाढविणार आहे. सरकार शांततेच्या मार्गाने दखल घेतना दिसत नाही. मंगळवारपासुन चक्री उपोषण करणाऱे सोडुन इतर शेतकरी इतर गावांमध्ये जावुन संपासाठी चर्चा करणार आहे. रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी झाली आहे.

आम्ही आमचे आदोलन सुरुच ठेवणार आहे.वेळपडली तरी आम्ही सामुदायीक आत्मदहन करण्याचा पवित्रा घेणार असल्याचाही इशारा शिंदे यांनी दिला. अॅड.भास्कर फडके म्हणाले, ''आमच्या मागण्या रास्त आहे.शेतकऱयांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत अपेक्षीत बाजार भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी कर्ज बाजारी झाला आहे. आम्हाला आमच्या घामाचे दाम द्या. मात्र, सरकार याकडे डोळेझाक करीत आहे. आम्ही शांतता मार्गाने आंदोलन-संप केला आहे.पण शेतकऱयांच्या लढ्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे.'' यावेळी सरपंच संपत फडके, माऊली शेळके आदींनी मनोगत व्यक्त करीत सरकारवर आगपाखड केली. 

re>

इतर ताज्या घडामोडी
फ्लॉवर, पापडी, घेवड्याच्या दरात १०...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
मराठवाड्यात दूध संकलनात ९८ हजार लिटरने...औरंगाबाद : मराठवाड्यातील दुग्धोत्पादनाला घरघर...
ऊस बिलावरून शेतकरी आक्रमकनाशिक  : वसंतदादा सहकारी साखर कारखाना...
येवला, देवळा, मालेगाव, सटाणा तालुक्यात...नाशिक : जिल्ह्यात शनिवारी (ता. २२) पावसाला सुरवात...
संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे...देहू, जि. पुणे  ः आषाढी वारीसाठी संत श्री...
पृथ्वीराज चव्हाण यांनी केली...कऱ्हाड, जि. सातारा  ः माजी मुख्यमंत्री आमदार...
अकोट तालुक्यातील केळी बागांना वादळी...अकोला  ः आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
नगर जिल्ह्यातील अकरा महसूल मंडळात...नगर  ः जिल्ह्यातील सर्वच भागांत पावसाने...
शेतकऱ्यांना अडवणाऱ्यांना शिवसेना...नगर   ः विमा योजनेत घोटाळा झाला...
नाचणी प्राक्रियेत संधीनाचणी हे पीक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत...
बीबीएफ तंत्रज्ञानानेच पेरणी, विश्वी...बुलडाणा ः येत्या हंगामात बीबीएफ तंत्रज्ञानाने...
सांगली जिल्ह्यात १८३ गावांना टँकरने...सांगली : जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा संपला...
जळगाव जिल्ह्यातील प्रकल्प कोरडे...जळगाव  ः खानदेशात सिंचन प्रकल्पांमध्ये मिळून...
आषाढी वारीत शासकीय महापूजेचा वेळ...सोलापूर : आषाढी एकादशी दिवशीची श्री विठ्ठल-रुक्‍...
जळगाव बाजार समितीत व्यापारी संकुलावरून...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
वऱ्हाडात महाबीज बियाणे मिळण्यापूर्वी...अकोला ः राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहीम व ग्राम...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयात...सातारा  : टेंभू उपसा सिंचन योजनेतून खटाव...
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात...मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ९८...
पाऊस लांबल्याने आता कोणते पीक घ्यावे?...नगर : मॉन्सून लांबल्याने आता खरीप पिकांत बदल...