Agriculture News in Marathi, farmers agitation, nanded, parbhani, hingoli district | Agrowon

ऊसदरासाठी स्वाभिमानी संघटनेने केले आंदोलन
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3 हजार रुपये भाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावमी करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुवारी (ता.7) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी उसाला प्रतिटन 3 हजार रुपये भाव द्यावा, संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावमी करावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी गुरुवारी (ता.7) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

सर्वच प्रकारच्या शेतीमालाचे उत्पादन घटल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करत शेतीमाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार भाव देण्यात यावा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले पाटील (नांदेड), रामप्रसाद अडकिने (हिंगोली) यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, नांदेड, हदगांव, भोकर, कंधार या तालुक्‍यांसह उमरी, धामधरी, कामठा, मेंढला आदी 32 ठिकाणी तसेच हिंगोली जिल्ह्यात डोंगरकडा तसेच अन्य ठिकाणी रोको आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनामध्ये शेतकरी, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. साखर कारखाना प्रशासनाने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु शेतकरी उत्स्फूर्तपणे या आंदोलनामध्ये सहभागी झाले, असे श्री. इंगोले यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
जात पडताळणीसाठी रक्त नात्यातील दाखला...नागपूर : रक्त नात्यातील व्यक्तीची जात पडताळणी...
कोंबडीखताचा वापर कसा करावा?मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर...
ऊस पाचटाचे गांडूळ खत कसे तयार करावे?गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी...
कृषी सल्ला : कापूस, भुईमूग, बाजरी, मका... कापूस बीटी कापूस बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम...
मका, सोयाबीन, हळदीच्या भावात घसरणएनसीडीईएक्समध्ये या सप्ताहात साखर व सोयाबीन वगळता...
अभिनव पद्धतीने सणसरला आंदोलनभवानीनगर, जि. पुणे   ः सणसर येथील कुरवली...
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध :...नागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत...
पुणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या दहा...
खारपाणपट्ट्यात भूसुधारणा कार्यक्रम...अकोला  : जिल्ह्यात खारपाणपट्ट्याचे प्रमाण...
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....