Agriculture News in Marathi, Farmers agitation, Parbhani district | Agrowon

कापूस, सोयाबीन टाकले जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

परभणी : बाजारामध्ये कोणत्याही शेतीमालाला आधारभूत किंमती एवढाही भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीमालाची खरेदी करावी, अशी मागणी करत शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.१०) जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या दालनामध्ये सोयाबीन तसेच कापूस आणून टाकला.

परभणी : बाजारामध्ये कोणत्याही शेतीमालाला आधारभूत किंमती एवढाही भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतीमालाची खरेदी करावी, अशी मागणी करत शेतकरी सुकाणू समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता.१०) जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या दालनामध्ये सोयाबीन तसेच कापूस आणून टाकला.

यंदा परभणी जिल्ह्यात खरिप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या पिकांच्या उत्पादनात ६० ते ७० टक्के घट आली आहे. त्यात बाजारामध्ये व्यापारी सर्वच शेतमालाची आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करत आहेत. सोयाबीनची आधारभूत किंमत ३,०५० रुपये प्रतिक्विंटल असताना व्यापारी १२०० ते २२०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहेत.

कापूस, मूग, उडीद या पिकांच्या बाबतीत हीच परिस्थिती आहे. आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात नाहीत. जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्रावर आजवर केवळ नऊ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.

बाजारात कोणत्याही शेतमालास आधारभूत किंमत मिळत नसल्यामुळे शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी शेतमालाची खरेदी करुन शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीप्रमाणे रक्कम द्यावी, या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीचे विलास बाबर, माउली कदम, अनंत कदम, मुंजाभाऊ कदम, नारायण आवचार, रोहिदास हरकळ आदीसह अनेक कार्यकर्ते, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कापूस आणि सोयाबीन आणून टाकले.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...