agriculture news in marathi, farmers agitation for several demands, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यात शेतकरी संपाला संमिश्र प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

पुणे : विविध मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. १) दहा दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय किसान महासंघाने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी संपावर जात आहेत. या दहा दिवसांच्या कालावधीत शेतकरी आपला कोणताही शेतीमाल विक्री करणार नाहीत. त्यानुसार शुक्रवारी (ता. १) जिल्ह्यातील ठिकठिकाणी दूध आणि भाजीपाल्याच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. पहिल्या दिवशी (ता. १) या संपाला जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

पुणे : विविध मागण्यांसाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शुक्रवारपासून (ता. १) दहा दिवस संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय किसान महासंघाने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकरी संपावर जात आहेत. या दहा दिवसांच्या कालावधीत शेतकरी आपला कोणताही शेतीमाल विक्री करणार नाहीत. त्यानुसार शुक्रवारी (ता. १) जिल्ह्यातील ठिकठिकाणी दूध आणि भाजीपाल्याच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. पहिल्या दिवशी (ता. १) या संपाला जिल्ह्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावरही किसान सभेच्या वतीने निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले होते. भोर तालुक्यातील खेड शिवापूर टोल नाक्यावर हजारो लिटर दूध रस्त्यावर टाकून सरकारचा निषेध करण्यात आला.या वेळी राष्ट्रीय किसान महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संपाचा भाग म्हणून रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास टँकरमधून दूध सोडून दिले. त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर दूध वाहत होते.

आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील तहसील कार्यालयासमोर किसान सभेच्या वतीने टाळकुटा आंदोलन झाले. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी भजने गाऊन शासनाचा निषेध केला. या वेळी किसान सभेचे अशोक पेकारी, राजू घोडे, अशोक जोशी, लक्ष्मण मावळे, दत्ता गिरंगे, सुनील पेकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आंदोलन संपल्यानंतर तहसीलदारांना शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही आंदोलन करण्यात आले होते. 

जुन्नर तालुक्यातही किसान सभेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. या वेळी तहसीलदारांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले. या वेळी संघटनेचे डाॅ. मंगेश मांडवे, लक्ष्मण जोशी, विश्वनाथ निगळे आदी उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात हुमणीच्या नुकसानीचा कहरपरभणी ः परभणी जिल्ह्यात उद्‍भवलेल्या दुष्काळी...
बाजार समिती कर्मचारी शासन आस्थापनावर...पुणे  ः राज्यातील बाजार समित्यांमधील...
पुणे विभागात चारापिकांची एक लाख...पुणे   ः जनावरांसाठी चाऱ्याची अडचण येऊ नये...
साताऱ्यात उसावर ‘हुमणी’चा प्रादुर्भावसातारा  ः जिल्ह्यातील विविध पिकांवर ‘हुमणी’...
नगर जिल्ह्यात ३५ हजार हेक्‍टरवरील उसावर...नगर  ः नगर जिल्ह्यात यंदा उसावर ‘हुमणी’चा...
‘पंदेकृवि’तील शिवारफेरीला शेतकऱ्यांचा...अकोला  ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी...
महसूल राज्यमंत्र्यांनी घेतला महागावमधील...महागाव, जि. यवतमाळ  ः दुष्काळग्रस्त भागात...
महाराष्ट्रातील जनताच पंतप्रधान मोदी...शिर्डी, जि. नगर   ः घरकुलाचा लाभ देण्यासाठी...
सरकारने कर्जमाफीत घोटाळा केला : उध्दव...नगर  ः राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी...
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
नाशिक जिल्ह्यात सर्वपक्षीय पाणी बचाव...नाशिक  : मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक...
इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना...इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी...
नगर जिल्ह्यात एप्रिलपासून चाराटंचाई...नगर  ः जिल्ह्यात यंदा पाऊस नसल्याचे...
शेतीतील सुधारणांसाठी कृषी विद्यापीठांची...अकोला   ः बदललेल्या परिस्थितीत शेतीतही मोठी...
नगर जिल्हा परिषदेत सरकार विरोधात...नगर  ः जिल्हा परिषदेच्या मालकीच्या...
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी...अकोला  ः तूर, सोयाबीन, हरभरा या पिकांचा विमा...
शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ,... पुणे ः पश्चिम महाराष्ट्रातील दूध व ऊस...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
धुळीतील जिवाणूंना रोखण्यासाठी हवे...खिडक्यातून आत येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे धुळीमध्ये...
हळदीमध्ये भरणी, खत व्यवस्थापन...हळदीची उगवण आणि शाकीय वाढ यांनतर पुढील दोन...