Agriculture News in Marathi, Farmers agitation start in kangaon, Pune district | Agrowon

कानगावमध्ये अाक्रोश अांदोलन, संपाला सुरवात
अमर परदेशी
शुक्रवार, 3 नोव्हेंबर 2017
वरवंड, जि. पुणे ः शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांना सरकारने गुंगारा दिल्याने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गुरुवारी (ता.२) अखेर राज्यव्यापी आक्रोश आंदोलन व शेतकरी संपाची ठिणगी पडली. 
 
वरवंड, जि. पुणे ः शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांना सरकारने गुंगारा दिल्याने दौंड तालुक्यातील कानगाव येथे गुरुवारी (ता.२) अखेर राज्यव्यापी आक्रोश आंदोलन व शेतकरी संपाची ठिणगी पडली. 
 
सकाळी शेतकरी, महिला, मुले, ज्येष्ठांनी मोठ्या संख्येने एकत्रित येऊन आक्रोश आंदोलनाची मशाल पेटवून प्रभात फेरी काढली. देवीच्या मंदिरातील गाभारा व कळसावर दूध ओतून अभिषेक केला. या वेळी सरकारला शेतकरीहिताच्या धोरणाची सतबुद्धी देवो, अशी जोरदार मागणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या नियोजित मागण्या पूर्ण करत नाही, तोपर्यंत गावात वेगवेगळ्या पद्धतीने चक्री आंदोलन व संप सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी बोलून दाखविला.
 
सरकाने शेतीविरोधी धोरणांचा सापाटा लावल्याने बळिराजा आर्थिक संकटाच्या खाईत आहे. त्यातच सरकाने दिशाभूल करणाऱ्या कर्जमाफीचे गाजर दाखविले असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य किसान मोर्चाचे समन्यवक व शेतकरी कामगार पक्षाचे नेते शांताराम कुंजीर यांनी २ नाव्हेंबरपासून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाची घोषणा केली होती.
 
त्यानुसार कानगावमध्ये आंदोलन व संप करण्यात अाला. या वेळी विविध मागण्यांचे फलक हातात घेऊन ‘शेतमाल आमच्या घामाचा नाही कोणाच्या बापाचा’ आदी घोषणांनी शिवार दणाणून सोडले.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...