agriculture news in marathi, Farmers agitation starts in country | Agrowon

देशासह राज्यात शेतकरी संपाला सुरवात...
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 जून 2018

पुणे: शेतकरी सुकाणू समितीने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न आंदोलकडून सुरू आहे.

पुणे: शेतकरी सुकाणू समितीने पुकारलेल्या राजव्यापी बंद ला राज्यात आज(शुक्रवार) पासून प्रारंभ झाला आहे. १० जून पर्यंत संप सुरु असणार आहे. मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, सांगली, परभणी, सातारा, जळगाव आदी राज्यातील बहुतांशी बाजार समित्यात शेतमालाची नियमित आवक असली तरी काही भागात दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचे प्रयत्न आंदोलकडून सुरू आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानातही शेतकरी संपास प्रारंभ झाला असून येथे अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वृत्त आहे. देशातील १३० शेतकरी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. महाराष्ट्रात काही शेतकरी संघटना यात सहभागी होणार नसून काहींनी आज धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कोल्हापुरात भाजीपाला मार्केट ला साप्ताहिक सुट्टी असल्याने संपाचा परिणाम जाणवला नाही. कांदा बटाट्याची आवक नियमित झाली. दुधाचे टँकर ही नियमितपणे रवाना झाल्याची माहिती दूध संघाच्या प्रतिनिधींनी दिली. 

पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर मार्गावर दूध टॅंकर शेतकरी आंदोलनकांनी अडवला. दूध रस्त्यावर ओतले. नाशिक जिल्ह्यातील सायखेड्यात दूधाचा टॅंकर अडविण्याचा शेतकऱ्यांनी प्रयत्न केला. या वेळी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. विदर्भात पहिल्या दिवशी व्यहवार सुरळीत सुरू होते. नागपूर बाजारसमिती सौदे नियमितपणे सुरू होते.

औरंगाबाद -कन्नड मार्गावर गल्ले बोरगाव येथील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध सांडून केला शासनाच्या धोरणाचा निषेध केले. औरंगाबाद येथे शेतकरी संपानिमित्ताने सकाळी 11 वाजता स्थानिक क्रांती चौकात क्रांती मशाल पेटविली जाणार आहे. लासुर स्टेशन परिसरातील पिंपळगाव येथे दूध वाटप होणार आहे.संपाची धार उद्या तीव्र होईल अशी माहिती विजय काकडे पाटील यांनी दिली. सांगली, सातारा, जळगाव, चाळीसगाव, परभणी बाजारसमित्यांमध्ये पहिल्या दिवशी तरी सर्व व्यवहर सुरळीत सुरू राहिले.

इतर अॅग्रो विशेष
कोकण, दक्षिण- मध्य महाराष्ट्रात आज... पुणे : पश्‍चिम मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र आणि...
जपानमधील शहरी शेतीजपान हे हजारो बेटांपासून तयार झालेले एक विकसित...
कुठे दिलासा, कुठे चिंताराज्यातील शेतकरी परतीच्या पावसाची वाट पाहून थकला...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
अवकाळी पावसाचा पुन्हा तडाखापुणे  ः दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र,...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...
गोड धाटाच्या ज्वारीपासून इथेनॉल नव्हे,...सध्या पेट्रोलसाठी पर्याय म्हणून इथेनॉल...
पिकते तिथेच करा प्रक्रियाहरितक्रांतीच्या काळात देशात साधनसंपत्ती विपुल...
कापूस गाठींचे देशांतर्गत उत्पादन घटणारजळगाव ः कापूस हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात...
दुष्काळप्रश्नी विरोधकांचा राज्य सरकारवर...मुंबई : दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना तातडीने मदत...
वादळी पावसाचा दणकापुणे : कोल्हापूर, सातारा, सांगली जिल्ह्यांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची...पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात...
पुरवणी मागण्या : दुष्काळग्रस्तांच्या...मुंबई : हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राज्यातील ७४ पाणलोट क्षेत्रांमध्ये अधिक...पुणे  : यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल...
आयटी क्षेत्रातील नोकरीपेक्षा हिरव्या...शेतीतील विविध संकटांमुळे युवक शेती सोडून नोकरी,...
नवे काश्मीर घडवणारे ‘बसेरा- ए- तबस्सुम'अधिक कदम या कोसेगव्हाण (ता. श्रीगोंदा, जि. नगर)...
पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंगमुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध...
ऊसतोडणीचे काम थांबवले शेतीतून नवी उमेद...शिरूर कासार (जि. बीड) या दुष्काळी तालुक्‍यातील...