agriculture news in marathi, farmers agitation starts in maharashtra | Agrowon

शेतकऱ्यांनी उपसले आंदोलनाचे हत्यार; राज्यात ठिकठिकाणी बंद
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 जून 2018

पुणे : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, सातबारा कोरा करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक अशा देशव्यापी दहा दिवसीय संपाला पहिल्याच दिवशी राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. संप असतानाही शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या अनेक जिल्ह्यांमध्ये अडवून संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर माल फेकला तर काही भागांमध्ये दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्यात आले. या संपात देशातील १३० संघटना उतरल्या आहेत. 

पुणे : शेतीमालाला दीडपट भाव द्यावा, सातबारा कोरा करावा, दुधाला प्रतिलिटर ५० रुपये भाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ऐतिहासिक अशा देशव्यापी दहा दिवसीय संपाला पहिल्याच दिवशी राज्यभर चांगला प्रतिसाद मिळाला. संप असतानाही शेतीमालाच्या वाहतूक करणाऱ्या गाड्या अनेक जिल्ह्यांमध्ये अडवून संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर माल फेकला तर काही भागांमध्ये दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्यात आले. या संपात देशातील १३० संघटना उतरल्या आहेत. 

दरम्यान, किसान सभेतर्फे राज्यात तहसील कार्यालयावर जनावरे सोडो आंदोलन आणि मोर्चांचे आयोजन करण्यात आले. लाखगंगा या दूध आंदोलकांच्या गावातूनही वैजापूर तहसील कार्यालयात जनावरे सोडण्यात अाली. तर, अकोले (जि. नगर) येथे किसान सभेतर्फे शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात आला. तर, गेल्या वर्षी शेतकरी संपाची हाक देणाऱ्या नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे सरकारच्या निषेर्धात श्राद्ध घालण्यात आले. काळे कपडे, काळ्या टोप्या आणि काळी गुढी उभारून निषेद व्यक्त करण्यात अाला.  
राज्यात दुधाचे टॅंकर अडवून दूध ओतून देण्याच्या ४० घटना घडल्या असून २० भाजीपाल्याची वाहने अडून माल फेकून देण्यात आला. आंदोलनकर्त्यांकडून गनिमी काव्याचे तंत्र अवलंबले जात असल्यामुळे पोलिस पहिल्याच दिवशी हैराण झाले. महासंघाचे प्रवक्ते संदीप गिड्डे म्हणाले की, शेतकरीपुत्र गनिमी काव्याने लढत आहेत. आम्ही आंदोलनाचे मुख्यालय नाशिक असल्याचे घोषित केले मात्र आंदोलन प्रत्यक्षात संगमनेर, पुणे, सांगली, सातारा या पट्ट्यात झाले. विदर्भातही आम्हाला अपेक्षित प्रतिसाद मिळाला आहे. 

राष्ट्रीय किसान महासंघाने एक जून ते दहा जून या दरम्यान देशव्यापी संपाची हाक दिली आहे. देशातील शेतकरी लढ्याच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त संघटना एकत्र येऊन दीर्घ मुदतीचा संप करीत सरकारला धक्का देण्याचा प्रयत्न प्रथमच होत आहे. महासंघाचे सर्व पदाधिकारी राज्याच्या विविध भागांत शुक्रवारी मध्यरात्रीपासून विखरले होते. प्रमुख मार्गांवरील शेतमाल रोखून धरण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी विविध जिल्ह्यांमध्ये फिरत होते. संप कालावधीत शेतकऱ्यांनी आपला माल फक्त गावातच विकावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. 

नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई या शहराची शेतमालाची रसद तोडण्यावर संपकरी शेतकऱ्यांनी भर दिला आहे. दूध, भाजीपाला, अन्नधान्य विविध भागांमध्ये पोचू न देता सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न संपकरी करीत आहेत. मात्र, संपाच्या पहिल्या दिवशी राज्यातील अनेक बाजारसमित्यांमध्ये माल आला होता. दुधाची वाहतूकदेखील बहुतेक भागात सुरळीत होती. 

आज (ता. २) संपाच्या दुसऱ्या दिवशी विविध ठिकाणी रास्ता रोको केला जाणार आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांचा शेतमालाचा व दुधाचा स्टॉक असल्यामुळे पुढील दोन दिवसांत मुंबईत टंचाई जाणवण्यास सुरवात होईल, असे महासंघाने म्हटले आहे.  
संगमनेरच्या वडगाव पान भागात संतप्त शेतकऱ्यांनी टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रक अडवून रस्त्यावर माल फेकून दिला. तसेच, समनापूर भागात दुधाचे टॅंकरचे कॉक सुरू करून रस्त्यावर दूध ओतण्यात आले.  पुढील दोन दिवसांनंतर दुधाचा एक थेंबही शहराकडे जाणार नाही अशी आमची भूमिका राहील. सरकारला वठणीवर आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे. 

इतर अॅग्रो विशेष
भारतीय लष्कराने घेतला बदला; पुलवामा...जम्मू : पुलवामात सीआरपीएफ जवानांवरील हल्ल्यानंतर...
आदिवासींचं श्रद्धास्थान असलेल्या कचारगड...कचारगड, जि. गोंदिया : मध्य भारतातील सर्व आदिवासी...
मराठवाड्यात दीड महिन्यात ७७...औरंगाबाद : मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र...
चार वर्षांत संत्रा उत्पादकांची दखलच...नागपूर : कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या आणि...
सांगली जिल्ह्यातील सहा कारखाने...सांगली  ः सहा कारखान्यांनी एकरकमी एफआरपी...
साखरेच्या टेंडरना प्रतिसाद नाही; दर...कोल्हापूर : साखरेच्या विक्री मूल्यात...
कांदा अनुदानाचे ११४ कोटी ‘पणन’ला वर्गसोलापूर : राज्यातील एक लाख ६० हजार शेतकऱ्यांसाठी...
देशातील हळद उत्पादनात वाढीची शक्यतासांगली ः यंदा देशातील महाराष्ट्र वगळता हळद...
किमान तापमानात चढ-उतार शक्य;...पुणे : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचे...
शेतीच्या मूळ दुखण्यावर हवा इलाज येत्या लोकसभा निवडणुकांत...
पोकळ घोषणा, की भक्कम आधार  पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच...
दुष्काळ निधीच्या याद्यांच्या नावे महसूल...जळगाव ः खानदेशात दुष्काळ निधीसंबंधी जिल्हा...
मराठवाड्याच्या घशाला कोरडऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांची...
‘स्वराज्य स्वर्णिम' योजनेद्वारे गड-...पुणे ः ग्रामीण पर्यटनातून रोजगार निर्मितीला...
कार्यकर्त्यांवर दडपशाही करून लाँग मार्च...नगर ः सरकारच्या विश्वासघाताविरोधात २०...
विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरीपंढरपूर, जि. सोलापूर: माघ वारीसाठी (जया...
महिला सक्षमीकरणाला गती : नरेंद्र मोदी यवतमाळ : यवतमाळसह राज्यात महिला बचत गटांचे...
द्राक्षाला निर्यातीची गोडीमुंबई  ः यंदा देशातील द्राक्ष हंगामावर...
राज्यात थंडी वाढली, निफाड पुन्हा ६...पुणे: वातावरणात झालेल्या बदलामुळे वाढलेले किमान...
देशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...