agriculture news in Marathi, Farmers agitation for sugarcane bill in Nanded | Agrowon

नांदेडमध्ये ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 जानेवारी 2018

परभणी ः नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोनपेठ (जि. परभणी) तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याकडील थकीत देयबाकी तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी (ता. १) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी ६ जानेवारी रोजी या कारखान्याच्या लिलावाची कारवाई करून ऊस थकबाकी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

परभणी ः नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सोनपेठ (जि. परभणी) तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याकडील थकीत देयबाकी तत्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी (ता. १) ठिय्या आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांनी ६ जानेवारी रोजी या कारखान्याच्या लिलावाची कारवाई करून ऊस थकबाकी देण्यात येईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, भोकर, अर्धापूर तालुक्यांतील अनेक गावांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी २०१५-१६ च्या गळीत हंगामामध्ये सोनपेठ (जि. परभणी) तालुक्यातील महाराष्ट्र शेतकरी शुगर्स साखर कारखान्याकडे घातलेल्या उसाची देयके थकीत आहेत. काही शेतकऱ्यांना प्रतिटन १ हजार ५०० रुपये प्रमाणे देयक अदा करण्यात आले. परंतु अनेक शेतकऱ्यांची देयके थकीत आहेत. शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर साखर आयुक्तांनी या कारखान्यावर आरआरसीची कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.

मात्र, या प्रकरणी कोणतीही कार्यवाही न करण्यात आल्यामुळे अद्याप नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थकीत ऊस देयक मिळाले नाहीत. त्यामुळे या कारखान्यावर आरआरसीची कार्यवाही करावी. उपलब्ध मालमत्तेचा लिलाव करून ऊस उत्पादकांची थकीत देयबाकी देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनने १८ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी पी. शिवांशकर यांच्याकडे केली होती.

देयक न दिल्यास १ जानेवारी रोजी सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सोमवारी (ता. १) सकाळी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले (नांदेड), भास्कर खटिंग (परभणी), किशोर ढगे, डिगांबर पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले.

या वेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी ६ जानेवारी रोजी पाथरी येथील उपविभागीय कार्यालयामध्ये महाराष्ट्र शेतकरी शुगर्स कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव करून ऊस देयके देण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर सामूहिक आत्महत्या आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे श्री. इंगोले यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...