agriculture news in Marathi, farmers agitation for sugarcane rates in pandharpur, Maharashtra | Agrowon

ऊसदरासाठी पंढरपुरात शेतकऱ्यांचे आंदोलन
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

सोलापूर : कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ऊस दराचा विषय निकाली निघालेला असताना, सोलापूर जिल्ह्यात मात्र कोणत्याही साखर कारखानदार वा प्रशासनाने अद्याप यावर काहीच कार्यवाही न केल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनाही अधिक आक्रमक होत आहेत. गेल्या आठवड्यापासून आक्रमक झालेले आंदोलक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. सोमवारी (ता.६) भंडीशेगाव येथे ऊस ट्रॅक्‍टरचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न झाला.

सोलापूर : कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यात यंदाच्या हंगामासाठी ऊस दराचा विषय निकाली निघालेला असताना, सोलापूर जिल्ह्यात मात्र कोणत्याही साखर कारखानदार वा प्रशासनाने अद्याप यावर काहीच कार्यवाही न केल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. दुसरीकडे शेतकरी संघटनाही अधिक आक्रमक होत आहेत. गेल्या आठवड्यापासून आक्रमक झालेले आंदोलक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले. सोमवारी (ता.६) भंडीशेगाव येथे ऊस ट्रॅक्‍टरचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न झाला.

गेल्या आठवड्यात बार्शी, पंढरपूर, माढा, पंढरपूर भागातील शेतकरी चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. सोमवारी आंदोलकांनी भंडीशेगाव (ता. पंढरपूर) जवळ श्रीपूर येथील पांडुरंग साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ट्रॅक्‍टरचे टायर फोडून ऊस वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे पंढरपूर व परिसरात ऊसदर आंदोलन अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेनेही बार्शीत शनिवारी आणि रविवारी गांधीगिरी करत थेट शेतकऱ्यांच्या फडात जाऊन ऊसतोडणी न करण्याचे आवाहन केले. गेल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार व शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक बोलावून यावर निर्णय घेतला, त्याप्रमाणे सोलापुरातही निर्णय व्हावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सहकारमंत्र्यांनी अखेर बोलावली बैठक
ऊसदराच्या या प्रश्‍नावर सोमवारी (ता.६) सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत जिल्ह्यातील शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक घेतली. त्यात ऊसदराच्या प्रश्‍नावर चर्चा झाली. पण येत्या १२ किंवा १३ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या अध्यक्षासोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे या वेळी ठरले. तशी सूचना त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना केली. त्यामुळे तूर्त तरी याविषयावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामदू पटेल, रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, बळिराजाचे जिल्हाध्यक्ष माउली हळणवर, विजय रणदिवे, सचिन पाटील, नवनाथ माने, उमाशंकर पाटील, माउली जवळेकर, प्रताप गायकवाड, विश्रांती भुसनर, मेजर नागटिळक आदी उपस्थित होते.
 

इतर ताज्या घडामोडी
यंदा पीक आणि पाऊस साधारण : भेंडवळच्या...भेंडवळ जि. बुलडाणा : या हंगामात पीक आणि पाऊस...
मराठवाड्यासाठी २० सौरऊर्जा प्रकल्पांना... लातूर ः मराठवाड्यातील विजेची गरज लक्षात घेऊन...
तयारी हळद लागवडीची...हळद लागवडीसाठी चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची...
सांगली जिल्ह्यात खंडित वीजपुरवठ्याने... सांगली  : कृष्णा आणि वारणा नदीचे पाणी...
मराठवाड्यातील ३२१ गावांना ३९६...औरंगाबाद  : मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत...
मिरजगाव येथे यंत्रणा सुरळीत, मात्र... नगर : तूर, हरभरा खरेदीसह अन्य बाबी ऑनलाइन...
नांदेड विभागातील २४ कारखान्यांचा गाळप... नांदेड :  नांदेड विभागातील यंदा गाळप सुरू...
व्यापाऱ्यांकडून फसवणूक : मनमाड बाजार...मनमाड, जि. नाशिक  : मनमाड कृषी उत्पन्न बाजार...
जळगाव येथे आंबा ४५०० ते ८००० रुपये... जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृषिपंपांच्या वीज थकबाकीवरून...मुंबई  ः सुमारे २३ हजार कोटी रुपयांच्या कृषी...
आमदार-खासदारांची धोरणे व्यापारीहिताचीपरभणी  ः आमदार-खासदारांनी संघटित होऊन...
पीकविमा परताव्यासाठीचे अन्नत्याग आंदोलन...परभणी  ः जिल्ह्यातील पीकविमा परताव्यापासून...
गुजरातमध्ये उन्हाळी पीक लागवड क्षेत्रात...मुंबई : सरदार सरोवर प्रकल्पातील कमी ...
`जलयुक्त`साठी पुणे जिल्ह्यातील 221...पुणे  ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी राज्य...
नगर जिल्ह्यात ‘नरेगा’तून साडेसहा हजार... नगर  ः ग्रामीण भागात मजुरांना रोजगार...
मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के... औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत...
बुलडाण्यातील सात हजारांवर कृषिपंपांची... बुलडाणा  ः जिल्ह्यात सद्यःस्थितीत सात...
बुलडाण्यात सोयाबीन क्षेत्र वाढण्याची... बुलडाणा  ः गेल्या हंगामात बीटी कपाशीवर...
कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप हंगाम आटोपला कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप...
तीन लाख ७२ हजार टन खतसाठा तीन...परभणी :  नांदेड, परभणी, हिंगोली...