agriculture news in Marathi, farmers agitation in tahsildar room for hellstrom compensation, Maharashtra | Agrowon

गारपीट अनुदानासाठी शेतकऱ्यांचा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या
टीम अॅग्रोवन
बुधवार, 10 जानेवारी 2018

अकोला ः संग्रामपूर तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. त्यासाठी शासनाकडून पंचनामे करून मदत देण्यात अाली. यामध्ये काही गावांतील शेतकरी नुकसान होऊनही वंचित राहले. वास्तविक या शेतकऱ्यांनी अनुदान उपलब्ध करून दिल्यानंतरही तांत्रिक कारणांनी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत असून, मंगळवारी (ता.९) तहसीलदारांचा कक्षात ठिय्या दिला.

अकोला ः संग्रामपूर तालुक्यात सन २०१४-१५ मध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली होती. त्यासाठी शासनाकडून पंचनामे करून मदत देण्यात अाली. यामध्ये काही गावांतील शेतकरी नुकसान होऊनही वंचित राहले. वास्तविक या शेतकऱ्यांनी अनुदान उपलब्ध करून दिल्यानंतरही तांत्रिक कारणांनी शेतकऱ्यांना दिल्या गेले नाही. यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत असून, मंगळवारी (ता.९) तहसीलदारांचा कक्षात ठिय्या दिला.

सन २०१४-१५मध्ये गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या नुकसानभरपाई म्हणून दहा महिन्यांपूर्वी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात अाले अाहे. मात्र एकलारा (बानोदा), बानोदा बुद्रुक व काटेलसह काही गावांतील शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित अाहेत. यासाठी शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

निवेदने दिली. डिसेंबर महिन्यात तहसील कार्यालयात महामुक्काम अांदोलनसुद्धा केले. या वेळी तहसील प्रशासनाने अाठ दिवसांत अनुदान वळती करण्याबाबत अाश्वासन देत अांदोलन सोडविले होते. मात्र हा कालावधी लोटूनही कुणाच्याही खात्यात निधी वळती झाला नाही. शिवाय याला दोषी असलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध कारवाईसुद्धा झालेली नाही.

त्यामुळे अाक्रमक होत शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा युवाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्यासह तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या अांदोलन सुरू केले. ४३ लाख रुपयांची ही मदत दहा महिन्यांपूर्वी तालुका प्रशासनाला मिळालेली असून तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वळती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली अाहे.

इतर ताज्या घडामोडी
तीन जिल्ह्यांत एक लाख क्‍विंटल तूर... औरंगाबाद  : खरेदी केंद्रे सुरू होऊन तूर...
नांदेड विभागातील बत्तीस कारखान्यांकडून... नांदेड  ः येथील प्रादेशिक साखर सहसंचालक...
बुलडाण्यातील २९ लघू प्रकल्प कोरडे बुलडाणा : दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत...
सोलापूर जिल्ह्यात साडेचार हजार शेततळी सोलापूर  : राज्य शासनाने पाणीटंचाईवर...
पूर्व विदर्भात धानाची उत्पादकता हेक्टरी... नागपूर  ः कमी पाऊस त्यासोबतच हंगामात...
जळगाव जिल्ह्यात गव्हाची आवक वाढतेय जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
सातारा जिल्ह्यात ऊस पाचट व्यवस्थापनाकडे... सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
जळगाव जिल्ह्यात गोदामे उपलब्ध नसल्याने... जळगाव : जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदी रखडली असून...
सूक्ष्म सिंचनाद्वारे खतांचा कार्यक्षम...फर्टिगेशनमुळे खते आणि पाणी कार्यक्षमपणे पिकांच्या...
पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०३ लाख... पुणे  ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा...
पुणे जिल्ह्यात गव्हाची काढणी सुरूपुणे  ः दिवसेंदिवसे शेतीकामांसाठी मजुरांचा...
ढगाळ हवामानाचा काजू उत्पादनाला फटकासिंधुदुर्ग : गेल्या आठवड्यात सलग चार दिवस...
कृषी विभागाच्या योजनांना गती द्या :...मुंबई : शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांच्या कामांना...
अॅग्री बिझनेस पदवीसाठी 'आयसीएआर'ची समितीपुणे : देशातील कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी...
कोयना धरणातील पाणीसाठा २५ टीएमसीने...मुंबई : कोयना धरणामध्ये २५ टीएमसी पाणीसाठा...
ग्रीन रिफायनरी ठेवणार की घालवणार?मुंबई  : राजापूर तालुक्यात प्रस्तावित...
तीव्र पावसाचा हायड्रोपोनिक्स...कॅलिफोर्नियातील अवकाळी आलेल्या तीव्र पावसाचा फटका...
स्वस्त धान्य दुकानदारांना पगार सुरू करा...मुंबई : राज्यातील स्वस्त धान्य...
ग्रीन रिफायनरी ठेवणार की घालवणार?मुंबई  : राजापूर तालुक्यात प्रस्तावित...
`डाळिंब निर्यातीतील अडथळे एकत्रित...सोलापूर  : डाळिंबाच्या उत्पादनातील शास्त्रीय...