agriculture news in marathi, Farmers agresive Against 'Green' in Nashik | Agrowon

नाशिकला ‘हरित’विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात हरितक्षेत्राअंतर्गत प्रस्तावित नगरपरियोजना राबविण्याच्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. न विचारताच परस्पर जमिनी हडपण्याचा डाव आखताच कशाला, असा सवाल शेतकऱ्यांनी केला अाहे. बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘एक इंचही जमीन देणार नाही’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा, महापौर, स्थायी समिती सभापती व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात हरितक्षेत्राअंतर्गत प्रस्तावित नगरपरियोजना राबविण्याच्या नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या प्रस्तावाविरोधात शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. न विचारताच परस्पर जमिनी हडपण्याचा डाव आखताच कशाला, असा सवाल शेतकऱ्यांनी केला अाहे. बळजबरीने भूसंपादन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत आंदोलनाचा इशारा दिला आहे. ‘एक इंचही जमीन देणार नाही’ असे सांगत सर्वोच्च न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा, महापौर, स्थायी समिती सभापती व जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

स्मार्ट सिटी कंपनीतर्फे हरित क्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत मखमलाबाद व हनुमानवाडी परिसरात नगरपरियोजना राबवली जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून महासभेवर प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महासभेच्या मंजुरीनंतरच त्याला हिरवा कंदील मिळणार असला तरी, या योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. मखमलाबाद, हनुमानवाडी परिसरातील २९४ बाधितांपैकी २७६ शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. ९) कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्यासह महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांना निवेदन दिले. हरित क्षेत्र विकासांतर्गत ३१५ एकर क्षेत्रात नगररचना परियोजना राबविण्याच्या निर्णयाबाबत शेतकऱ्यांना कोणतीही माहिती नाही.

ज्या शेतकऱ्यांची जमीन घेतली, त्यापैकी अनेक जण यापूर्वीच्या प्रकल्पांमध्येच बाधित आहेत. त्यामुळे हरित क्षेत्र विकासासाठी ५० टक्के जमीन कोणत्याही परिस्थितीत दिली जाणार नाही, असे शेतकऱ्यांनी ठणकावले आहे. शरद कोशिरे, प्रकाश जगझाप, सुरेश पाटील, डॉ. दिनेश बच्छाव यांच्यासह २७६ शेतकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. अहमदाबादच्या दौऱ्यासाठी कंपनीतर्फे महापौरांसह शेतकऱ्यांची व नगरसेवकांची मनधरणी सुरू आहे. परंतु जागामालक शेतकऱ्यांनी या दौऱ्याला विरोध दर्शविला आहे.

 

इतर बातम्या
राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...मुंबई : राज्यातील १८० तालुक्यांमध्ये...
नगर-नाशिकच्या धरणातून ‘जायकवाडी’त पाणी...मुंबई : ‘जायकवाडी’ धरणात पाणी सोडण्याचे आदेश...
गाडीने येणारा कापूस गोणीत आणण्याची वेळ जालना : जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्याचा...
दुष्काळाच्या गर्तेत गुरफटला गावगाडाऔरंगाबाद : पावसाळ्यात पडलेले प्रदीर्घ खंड व...
अकोला जिल्ह्यात दुष्काळस्थिती गंभीरअकोला : पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात कडधान्यांच्या आवकेत घटजळगाव : खानदेशात ज्वारीचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी...
खानदेशातील दुष्काळी स्थिती गंभीरजळगाव : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये अल्प...
पाणीटंचाई टाळण्यासाठी ‘जलयुक्‍त`वर भर...यवतमाळ : जिल्ह्यात सरासरी समाधानकारक पाऊस झाला....
शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या...वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत...
दुष्काळ जाहीर करण्यासाठी पीक नुकसानीचा...नाशिक : दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्र सरकारची...
नखातवाडी तलावातील पाणीसाठा जोत्याखालीपरभणी ः वाढते तापमान, जोराचे वारे, उपसा यामुळे...
रासायनिक खते, कीटकनाशके वापराविषयी...परभणी ः रासायनिक खते, कीटकनाशकांच्या असंतुलित...
सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी :...जाफराबाद, जि. जालना  : तालुक्‍यातील पीक...
पालखेडच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमकयेवला, जि. नाशिक : येवला तालुका सतत दुष्काळी...
कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्...कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या...
हरभरा लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शनऔरंगाबाद : कृषी विज्ञान मंडळाच्या...
सांगली जिल्ह्यात रब्बीची पेरणी संकटातसांगली : जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस पुरेसा झाला...
मुंबईत १५ ला सर्वपक्षीय मेळावा ः नवलेकोल्हापूर: किसान सभेच्या पुढाकाराने १५...
नगरमधील आठ तालुके अद्यापही रब्बी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये रब्बीची आतापर्यंत अवघी नऊ...
नव्या दुष्काळी संहितेमुळे राज्यातील...मुंबई: राज्यावर १९७२ च्या दुष्काळापेक्षाही...