कृषी विभागाच्या कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पूर्णा, जि. परभणी : पूर्णा तालुक्यातील सर्व गावांची पैसेवारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन काढण्यात यावी या मागणीचे ग्रामपंचायतीनी घेतेलले ठराव सादर करण्यासाठी शेतकरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेले. मात्र त्या ठिकाणी अधिकारी उपस्थित नव्हते. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयास शुक्रवारी (ता. ६) टाळे ठोकले.

पूर्णा तालुक्यातील ९५ गावांची पैसेवारी ५० पैसे पेक्षा अधिक दाखविल्याबद्दल ग्रामपंचायतींचे ठराव घेऊन शेतकरी कृषी कार्यालयात गेले होते. परंतु दुपारचे साडेबारा वाजले तरी तेथे एका कर्मचाऱ्याशिवाय कोणीही उपस्थित नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयास टाळे ठोकले. त्यानंतर तेथे महसूल, पोलिस प्रशासनाने धाव घेत शेतकऱ्यांच्या भावना समजून घेतल्या. या वेळी त्यांना निवेदन देण्यात आले. दुपारी तीन वाजता हे टाळे उघडण्यात आले.

कार्यालयातच बसून तालुक्यातील ९५ गावांची पैसेवारी ५० टक्क्यांहून अधिक असल्याचा जावाई शोध प्रशासनातर्फे लावण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी (ता. ६) खुजडा, निळा, हाटकरवाडी, फुकटगाव, कान्हेगाव, गणपूर, ममदापूर, एकरुखा येथील ग्रामपंचायतीचे ठराव घेऊन तेथील काही शेतकरी बाजार समितीचे संचालक संतोष कुर्हे यांच्या नेतृत्वाखाली तालुका कृषी कार्यालयात गेले होते.

निवेदनावर पंचायत समितीचे सभापती अशोक बोकारे, संतोष कुर्हे, बालासाहेब नवघरे, दत्तराव नवघरे, राम यमगर, देवराव सदगर, भारत कुर्हे, माणिकराव बोकारे, मोतीराम काळबांडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com