agriculture news in marathi, Farmers' anger over burning of documents | Agrowon

कागदपत्रे जाळून शेतकऱ्यांचा संताप
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 29 जून 2018

कुंभार पिंपळगाव, जि. जालना : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मारोतीच्या पारावर लावून मंदिरात कर्ज प्रकरणाची कागदपत्रे घेणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकांना गुरुवारी (ता. २८) संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून पिटाळून लावले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी कर्ज प्रकरणासाठी जमा केलेली कागदपत्रे जाळून संताप व्यक्त केला.

कुंभार पिंपळगाव, जि. जालना : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या मारोतीच्या पारावर लावून मंदिरात कर्ज प्रकरणाची कागदपत्रे घेणाऱ्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखा व्यवस्थापकांना गुरुवारी (ता. २८) संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी विविध प्रश्न विचारून पिटाळून लावले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी कर्ज प्रकरणासाठी जमा केलेली कागदपत्रे जाळून संताप व्यक्त केला.

गुरुवारी बॅंकेच्या वतीने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज देण्यासाठी कागदपत्रे जमा करण्यासाठी कॅंप घेण्यात आला होता. या अगोदर शुक्रवारी (ता. १५) झालेल्या कॅंपमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कागदपत्रे दिली होती. मात्र, कागदपत्रे बॅंकेत न देता मंदिरातच द्यावीत असा आदेश काढल्याने शेतकरी कागदपत्रे देण्यासाठी मंदिरात थांबले होते. गुरुवारी सकाळी बॅंकेचे व्यवस्थापक संदीप कदम एका सहकाऱ्यासह आले. मात्र, मंदिराऐवजी मंदिराजवळच असलेल्या सभागृहात त्यांनी बस्तान मांडले.

शेतकऱ्यांची कागदपत्रे घेताना आणि देताना बारीकसारीक गोष्टीवरून वाद सुरू झाला. यामुळे शेतकरी व अधिकारी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शेतकरी चिडले व त्यांनी शाखा व्यवस्थापकांना सभागृहाच्या बाहेर काढून दिले. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी जमा केलेली कागदपत्रे फाडून, जाळून निषेध व्यक्त केला.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
कृषी सल्ला : पेरू, गहू, हरभरा, डाळिंब,...पेरू - फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रतिएकर ४ रक्षक...
कमाल तापमानात वाढ, उन्हाळी हंगामाला...महाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
पलटी नांगर, रोटाव्हेटरचे अनुदान वाढणार...जळगाव : जिल्हा परिषदेच्या आगामी अंदाजपत्रकात (...
ढगाळ वातावरणाचा द्राक्ष खरेदीवर परिणामपांगरी, जि. सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून...
जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोधनाशिक : नाशिक-पुणे रेल्वे लाईनच्या महाराष्ट्र रेल...
तुमच्या आग्रहापुढे मी नाही कसे म्हणू...टेंभूर्णी, जि. सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील...
शिराळ्यातील गूळ हंगाम अवघ्या तीन...सांगली ः शिराळा तालुक्यातील दरवर्षी पाच ते साडे...
आठ दिवसांत पूर्ण एफआरपी द्या; अन्यथा...सातारा ः सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील साखर...
अडत्यांवरील कारवाईला प्रशासकांचीच...पुणे ः खरेदीदार आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य...
छावण्यांच्या मंजुरीसाठी शिवसेनेचा ठिय्यानगर : जिल्ह्यात पशुधनाला दिलासा देण्यासाठी...
जालन्यातील कृषी माल निर्यात सुविधा...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पैठण तालुक्यातील पिकांना अवकाळीचा फटकाचितेगाव, जि. औरंगाबाद : विजेच्या कडकडाट व वादळी...
परभणी जिल्ह्यातील ‘शेतकरी सन्मान निधी’...परभणी ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी...
पाकिस्तान युद्धाच्या तयारीत,...श्रीनगर : काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी...
कृषी सल्ला : वाल, आंबा, काजू, नारळ,...वाल काढणी अवस्था वाल पिकाची काढणी जसजशा शेंगा...
तेल्हारा, अकोट तालुक्यांत अवकाळी पाऊस;...अकोला : जिल्ह्यात तेल्हारा, अकोट तालुक्यांत...
ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत जळगाव : मागील दोन-तीन दिवसांपासून खानदेशात ढगाळ,...
अमरावती जिल्ह्यात सव्वालाख शेतकऱ्यांची...अमरावती : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील दोन...
माथाडी कामगारांच्या आंदोलनामुळे गूळ...कोल्हापूर ः माथाडी कामगारांनी जादा वेळ काम...
जायकवाडी पाटबंधारे विभाग क्रमांक...परभणी ः परभणी येथील जायकवाडी पाटबंधारे विभाग...