कर्जमाफीसाठी सव्वादोन लाख शेतकऱ्यांचे अर्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या लाभासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख २० हजार ९९० शेतकरी कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. आता चावडीवाचनाच्या प्रक्रियेनंतर या योजनेची अंमलबजावणी कशी होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी जिल्ह्यात पंढरपूर तालुक्‍यातून सर्वाधिक ३२ हजार ६९५ अर्ज दाखल झाले आहेत. माळशिरसमधून ३० हजार २९४, माढ्यातून २५ हजार ८०८, करमाळ्यातून २१ हजार ८५९, बार्शीतून २१ हजार ६०९, मोहोळमधून १८ हजार ७२२, अक्कलकोटमधूून १७ हजार ४९०, सांगोल्यातून १७ हजार ८०, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातून १३ हजार ६४४, उत्तर सोलापूर तालुक्‍यातून नऊ हजार ३०४ शेतकरी कुटुंबांनी अर्ज दाखल केले आहेत. दाखल झालेल्या अर्जांची पारदर्शकपणे पडताळणी करण्यासाठी चावडीवाचन होणार आहे.

चावडीवाचनाचा अहवाल तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय समितीला देण्यात येणार आहे. बॅंकांकडे असलेली कर्जाची माहिती १ ते ६६ कॉलममध्ये भरण्याचे कामही सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या सगळ्या प्रक्रियेनंतर कर्जाचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com