agriculture news in marathi, the farmers are denied drip set subsidy, satara, maharashtra | Agrowon

साताऱ्यातील चौदाशेवर शेतकरी ठिबक अनुदानापासून वंचित
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018
सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवण्यापूर्वी पूर्वसंमती घेतले नसल्याचे कारण देत त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस खीळ बसणार आहे. तसेच संच बसवूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. 
 
सातारा : जिल्ह्यातील २०१६-१७ मध्ये चौदाशेवर शेतकऱ्यांनी ठिबक संच बसवण्यापूर्वी पूर्वसंमती घेतले नसल्याचे कारण देत त्यांना अनुदानापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस खीळ बसणार आहे. तसेच संच बसवूनही अनुदान मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. 
 
पाण्याचा अतिरिक्त वापर टाळला जावा या दृष्टीने पिकांना पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने वेगवेगळ्या घोषणा केल्या जातात. शेतकऱ्यांना प्रोत्साहान मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकाकडून अनुदान दिले जात आहे. मात्र २०१६-१७ मध्ये १४०० शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाचे सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आलेले नाही.
 
या संदर्भात कृषी विभागाकडून महिती घेतली असता या शेतकऱ्यांनी पूर्वसंमती घेतली नसल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची पूर्वसंमती घेतली नाही, तर ऑनलाइन नोंदणी कशी करून घेतली, प्रस्ताव कसे सादर करून घेतले हा यासारखे प्रश्‍न निर्माण होत आहे.
 
तत्कालीन जिल्हाधिकारी अश्‍विन मृद्‌गल यांनी जिल्ह्यात जास्ती जास्त शेतजमीन ठिबक सिंचनाखाली यावी यासाठी ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ अशी घोषणा करत जनजागृत्ती करण्यास सुरवात केली होती. यामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी ठिबक संच वापरण्याकडे वळले आहेत. या संकल्पनेचे तत्कालीन कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी कौतूक केले होते. मात्र अनुदानातील वांरवार विलंबामुळे ‘वावर तेथे ठिबकची पॉवर’ या संकल्पनेस घरघर लागण्याची शक्‍यता आहे.
 
शेतीमालाच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले असून पाणीबचतीसाठी कर्ज काढून ठिबक संच बसवित आहे. मात्र अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या अगोदर २०१२-१३ मध्ये ऑनलाइन नोंदणी केली नसल्यामुळे जिल्ह्यातील १३०० शेतकऱ्यांना अनुदानपासून वंचित रहाण्याची वेळ आली होती. या वेळी मात्र पूर्वसंमती न घेतल्यामुळे अनुदान दिले नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु पूर्वसंमती घेतली नसतानाही प्रस्ताव कोणत्या आधारावर घेण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे. 
 
२०१६-१७ मध्ये अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी कोरेगाव, खटाव तालुक्‍यातील आहेत. कोरेगाव व खटाव या दुष्काळी तालुक्‍यांचा कल उपलब्ध पाण्याचा योग्य प्रकारे वापर करण्याकडे वाढला आहे. मात्र या तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर अनुदानापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे. २०१७-१८ मधील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना आमचे मागील वर्षाचे अनुदान का मिळेना, यासाठी कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरे झिजवत आहेत.

इतर ताज्या घडामोडी
मत्स्यपालनामध्ये योग्य तांत्रिक बदलांची...सध्याच्या मत्स्यपालन पद्धतीमध्ये कोणतेही बदल न...
जळगाव बुरशीयुक्त शेवयांच्या प्रकरणात...जळगाव ः शालेय पोषण आहार वाटपानंतर अंगणवाडीमधील...
सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवातसातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह...सांगोला/करमाळा : जिल्ह्याच्या काही भागांत...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात...पुणे : गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी...
मातीचा प्रत्येक कण सोन्यासारखा; तो वाया...नाशिक : शेतातील माती म्हणजे कोट्यवधी सूक्ष्म...
नांदेड जिल्ह्यात १ लाख ६५ हेक्टरवर पेरणीनांदेड ः नांदेड जिल्ह्यामध्ये यंदाच्या खरीप...
शेतकऱ्यांना पीककर्ज देणे टाळले तर ठेवी...नगर  ः शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगामासाठी...
सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायमसातारा  ः जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण,...
नांदेड जिल्ह्यात फक्त ८.२९ टक्के...नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील यंदा खरीप पीककर्ज...
तापीच्या पाण्यास गुजरातचा नकारमुंबई  ः पार-तापी नर्मदा नद्याजोड...
कापूस पीक नियोजनातून हमखास उत्पादन वाढसोनगीर, जि. धुळे ः कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी...
औरंगाबाद जिल्ह्यात अखेर पाऊस बरसलाऔरंगाबाद  : पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या...
`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण...नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे...
मराठवाड्यात साडेतीन लाख हेक्‍टरवर पेरणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ३ लाख ६७...
पीककर्जासाठी बँक अधिकाऱ्याने केली...दाताळा, जि. बुलडाणा : पीककर्ज मंजूर करून...
माॅन्सून सक्रिय, सर्वत्र चांगल्या...महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी झालेले असून १००४...
‘एसआरआय’पद्धतीने भात लागवडीचे तंत्रएसआरआय पद्धतीने भात लागवड केल्यामुळे रोपे, माती,...
भूमिगत निचरा प्रणालीद्वारे जमिनींची...पाणी व रासायनिक खते यांच्या अनियंत्रित वापरामुळे...
लागवड सावा पिकाची...जून महिन्यात सावा पिकाची पेरणी करावी. दोन ओळीतील...