agriculture news in marathi, Farmers are deprived from Kharif, Banana crop returns | Agrowon

खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून शेतकरी वंचित
टीम अॅग्रोवन
रविवार, 16 डिसेंबर 2018

जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेले अनेक शेतकरी योजनेच्या परताव्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीचे संबंधित भेटत नाहीत. कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांच्या ताब्यात गेल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. केळी पीकविम्यासंबंधीची ३२ टक्केच रक्कम परताव्यात मिळाली आहे. उर्वरित रक्कम केव्हा मिळेल, हा प्रश्‍न केळी उत्पादकांसमोर आहे. 

जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत सहभागी झालेले अनेक शेतकरी योजनेच्या परताव्यापासून वंचित आहेत. विमा कंपनीचे संबंधित भेटत नाहीत. कोट्यवधी रुपये विमा कंपन्यांच्या ताब्यात गेल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. केळी पीकविम्यासंबंधीची ३२ टक्केच रक्कम परताव्यात मिळाली आहे. उर्वरित रक्कम केव्हा मिळेल, हा प्रश्‍न केळी उत्पादकांसमोर आहे. 

 ज्या शेतकऱ्यांनी गावात विविध कार्यकारी सहकारी सोसायटी व राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या माध्यमातून पीककर्ज घेतले त्यांच्याकडून पीकविमासंबंधीचे हप्ते किंवा रक्कम सक्तीने कापून घेण्यात आली. पावसाळा अत्यल्प झाला. जिल्ह्यातील १३ तालुके दुष्काळी आहेत. तर धरणगावमधील सोनवद महसूल मंडळही दुष्काळी 
आहे.  
जिल्ह्यात एकूण १६ हजार ७५० शेतकरी विमा योजनेत परताव्यासंबंधी पात्र ठरले आहेत. त्यांना २७ कोटी रुपये परतावा मिळणे अपेक्षित आहे. परंतु हा निधीच मिळालेला नाही. जिल्ह्यात १५ तालुके आहेत. यातील एकट्या अमळनेर तालुक्‍यातून ११ हजार ८४९ विमाधारक शेतकरी असून, त्यात नियमित कर्ज फेडणारे ११ हजार ३५९ शेतकरी व ४९० ऐच्छिक शेतकऱ्यांनी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या माध्यमातून पीकविमा हप्ता भरला. त्यातून सद्यःस्थितीत तालुक्‍यातील ११ हजार ८४९ शेतकऱ्यांपैकी ७ हजार ९५१ शेतकऱ्यांचीच नावे यादीत समावेश आहे. अमळनेर तालुक्‍यातून १८ गावांची यादीच पूर्णता गायब झाली आहे. अशीच स्थिती जिल्ह्यात इतर तालुक्‍यांमध्ये आहे. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली, परंतु उपयोग झालेला नसल्याची स्थिती आहे. 

केळी पीकविमासंबंधी तक्रारी कायम
जिल्ह्यातील केळी उत्पादकांनी हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत सहभाग घेतला, परंतु आता भरपाई देताना कमी निधी दिला जात आहे. विमा कंपनीचे कर्मचारीच कुठे नसतात. त्यांचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी कुठे असते, हे शेतकऱ्यांना माहीत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या तक्रारी पूर्णतः मार्गी लागत नाहीत, तोपर्यंत विमा कंपनीचा प्रतिनिधी विविध तालुक्‍यांमध्ये यायला हवा, अशी मागणी केळी उत्पादकांनी ऑक्‍टोबर महिन्यात जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. परंतु हे कर्मचारी यावल, रावेरात अजूनही नियुक्त झालेले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळाचा प्रभाव ओसरू...
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...