agriculture news in marathi, farmers are not getting MSP : Union Agriculture Minister | Agrowon

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीत : केंद्रीय कृषिमंत्री
वृत्तसेवा
सोमवार, 8 जानेवारी 2018

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत अद्यापही केंद्राने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे वास्तव असून शेतीमालास रास्त दर मिळावेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले.

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत अद्यापही केंद्राने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे वास्तव असून शेतीमालास रास्त दर मिळावेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, याविषयी काय योजना आहेत असे प्रश्न काही सदस्यांनी विचारले होते. राज्यसभेत शून्य प्रहरात चर्चेवेळी या प्रश्नांना उत्तर देताना कृषिमंत्री सिंह म्हणाले, की माझा स्वत: चा अनुभव आहे की दिल्ली ते कोलकता या दोन शहरांतील परिसरात आणि येथून आसपासच्या १०० किलोमीटरच्या परिघात सरकारने भातासाठी जाहीर केलेली ‘एमएसपी’ शेतकऱ्यांना बहुतेक वेळा मिळत नाही. गहू आणि भाताशिवाय अन्य काही शेतीमालांनाही हमीभाव जाहीर करण्यात येतो. शिवाय किमत साह्य योजनासुद्धा (प्राईस सपोर्ट स्कीम) आहे. या योजनेंतर्गत हमीभावापेक्षा दर कमी झाल्यास सरकारद्वारे खरेदी करण्यात येते. राज्याकडून याविषयी प्रस्ताव आल्यास केंद्र अर्थपुरवठाही करते.

माझा स्वत:चा असा अनुभव आहे, की सरकारने जाहीर केलेली ‘एमएसपी’ शेतकऱ्यांना अभावानेच मिळते. शेतीमालाच्या दरासंदर्भात योग्य पद्धती कोणती असावी, याविषयी निती आयोग आणि राज्यांसोबत चर्चा सुरू आहे.
-राधामोहन सिंह, केंद्रीय कृषीमंत्री

इतर अॅग्रो विशेष
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...
राजकीय उपद्रव्य मूल्य घटल्याने...मुंबई: मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रव मूल्य...
सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांची...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच ११४५...
विदेश अभ्यास दौऱ्याच्या शेतकरी यादीत...पुणे : विदेश अभ्यास दौऱ्यासाठी निवड केलेल्या...
क्रांती कारखाना हुमणीचे भुंगेरे खरेदी...कुंडल, जि. सांगली : एकात्मिक हुमणी कीड नियंत्रण...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
परवानाधारक व्यापाऱ्यांनीच केळीची खरेदी...जळगाव : चोपडा बाजार समिती दरवर्षी १४...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर...पणजी : देशाचे माजी संरक्षणमंत्री व गोव्याचे...
आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? दुष्काळ पडल्याने पाण्यासाठी बोअर घेण्याची अक्षरशा...
कृषी पर्यवेक्षकांना पदोन्नती मिळाली, पण...पुणे : राज्यातील कृषी पर्यवेक्षकांना शासनाने मंडळ...
दुष्काळी मराठवाड्यात मार्चमध्येच ‘केसर'...केज, जि. बीड ः फळांचा राजा आंबा बाजारात...
मिरची पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार (प्रतिनिधी) ः खानदेशातील मिरचीचे आगार...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
परभणी ठरले देशात उष्णपुणे : राज्यात अनेक ठिकाणी तापमान ३७ अंशांच्या...