agriculture news in Marathi, farmers are not interested in sell of soybean, Maharashtra | Agrowon

सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा आखडता हात
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

केंद्रात मंत्रिगटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आठ दिवसांत सकारात्कमक निर्णयाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी धीर धरून टप्प्या-टप्प्याने सोयाबीन बाजारात आणले, तर त्यांना दरातील सुधारणांचा लाभ होईल असा अंदाज आहे.
- पाशा पटेल, अध्यक्ष, राज्य कृषीमूल्य अायोग.   

पुणे : देशाच्या तेलबिया आणि कडधान्य धोरणात आठ दिवसांत फेरबदल होण्याचे संकेत मिळताच शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी हात आखडता घेण्यास प्रारंभ केला अाहे. या संदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता वाढल्याने बाजारदरात सुधारणा होण्याचे संकेतही व्यापाऱ्यांसह तेलबिया उद्योगाने दिल्याने सोयाबीनची आवक मंदावण्याचा अंदाज आहे. 

केंद्र सरकारच्या मंत्रिगटाची दुसरी बैठक नुकतीच दिल्लीत पार पडली. या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा शेतमाल विशेषत: तेलबिया आणि कडधान्यांच्या आयात-निर्यातीसंदर्भातील सादरीकरण करून या प्रश्‍नाचे महत्त्व विशद केले. 

अन्नमंत्री रामविलास पासवान यांनीसुद्धा हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असेल, तर आयात-निर्यात धोरणात सुधारणांकरिता स्वतंत्र यंत्रणेची मागणी नोंदविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत सुधारणांना हिरवा कंदील दाखविल्यामुळे या बैठकीत पंतप्रधानांचे सचिव आणि कॅबिनेट सचिव, वाणिज्य मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते. लवकरच या संदर्भात योग्य निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी दिले.

सोयाबीनला ३०५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव आहे. मात्र, सध्या १४०० ते २५०० दरम्यान दर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधीच पेरणीनंतरचा पावसाचा खंड आणि काढणीच्या वेळेला आलेला पाऊस यामुळे उत्पादकता कमी होऊन मोठे नुकसानही झाले.

केंद्र सरकारने महाराष्ट्रातून १ लाख टन सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याचे जाहीरही केले; परंतु राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे पीक असलेल्या सोयाबीनचे यंदा ३८ लाख टन उत्पादन होण्याची शक्यता अाहे. अशातच एक लाख टनाच्या खरेदीच्या घोषणेने बाजार दरावर तसूभरही परिणाम झाला नाही. किंबहुना बाजारातही दरातील घसरणही राेखली गेली नाही. 

प्रतिक्रिया
केंद्रातील निर्णयाची प्रतीक्षा आहे. सोयाबीन दरात सुधारणा होणार असल्यास आम्ही काही काळ वाट पाहण्यास तयार आहोत.
- बाजीराव कदम, रवंदे, ता. कोपरगाव, जि. नगर

इतर अॅग्रो विशेष
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...