agriculture news in Marathi, farmers are plundering on CCI centers behind porterage in Jalgaon District, Maharashtra | Agrowon

हमाली वसुलीतून ‘सीसीआय’च्या केंद्रावर शेतकऱ्यांची लूट
टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मागील हंगामात सीसीआयच्या केंद्रांवर बैलगाडीतून कापूस उतरविण्याची मजुरी शेतकऱ्यांकडून घेतल्याच्या तक्रारी आल्या तर त्याची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. 
- कैलास चौधरी, प्रभारी सभापती, जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती

जळगाव : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदी केंद्रात कापूस विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडून मागील हंगामात सर्रास बैलगाडीतून कापूस उतराईची मजुरी उकळण्यात आली. जवळपास सव्वा लाख क्विंटल कापूस सीसीआयच्या केंद्रात खरेदी केला. यात लाखो रुपयांची लूट झाली असून, हमालांच्या नावे वरकमाईचा प्रकार झाल्याची कुजबूज शेतकरी व सहकार क्षेत्रातील मंडळीमध्ये आहे. 

जिल्ह्यात मागील हंगामात पणन महासंघाच्या केंद्रापेक्षा खुल्या बाजारात दर अधिक होते, त्यामुळे कापूस खरेदीला प्रतिसाद लाभला नाही. पण सीसीआयने खुल्या बाजारात कापूस खरेदी जानेवारीत सुरू केली. जळगाव, कुऱ्हे पानचे (ता. भुसावळ) आणि एरंडोल येथे ही खरेदी सुरू होती. यंदा मात्र सीसीआयने अजून खुल्या बाजारात कापूस खरेदी सुरू केलेली नसल्याने सीसीआयच्या केंद्रांवर कुठलीही आवक झालेली नाही व शेतकऱ्यांकडून बैलगाडीतून कापूस उतरविण्यासंबंधीचे पैसे उकळण्याचे प्रकार सुरू नसल्याचे सांगण्यात आले. 

बैलगाडीतून शासकीय खरेदी केंद्रात जो कापूस येतो तो उतरविण्यासाठी किंवा बैलगाडी रिकामी करण्यासाठी संबंधित केंद्राला मजुरी शासकीय यंत्रणेकडून हंगामाच्या अखेरिस मिळते. परंतु सीसीआयच्या केंद्रांवर मागील हंगामात सर्रास बैलगाडीतून कापूस उतरविण्यासाठी क्विंटलमागे १० रुपये मजुरी उकळण्यात आल्याची तक्रार असून, खुद्द पणन संचालक संजय पवार यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. बैलगाडीतून आलेल्या कापसासंबंधी जशी हमाली आकारली तशीच हमाली ट्रॅक्‍टरमधून आलेल्या कापसालाही आकारली. बैलगाडीत साडेपाच क्विंटल तर ट्रॅक्‍टरमध्ये कमाल ३० क्विंटल कापूस येत होता. ट्रॅक्‍टरबाबत शेतीचा कुठलाही नियम न लावता त्यास व्यावसायिक नियम लावून कापूस उतरविण्याची मजुरी संबंधित ट्रॅक्‍टरमालक शेतकऱ्याकडून सर्रास आकारली गेली, अशी माहिती मिळाली. 

सीसीआयने मागील हंगामात उशिराने खुल्या बाजारात कापूस खरेदी सुरू केली होती. सर्वच केंद्रांवर प्रतिसाद मिळणार नाही म्हणून तीनच केंद्र सुरू केले होते. त्यात अखेरपर्यंत सव्वा क्विंटल कापूस खरेदी झाला. एवढ्या कापसासंबंधीची उतरविण्याची हमाली शासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्याकडूनही आणि शासनाकडूनही बैलगाडी व वाहनातून कापूस उतरविण्याची मजुरी आकारली. पण हा प्रकार केवळ हमालांनी केला, शेतकरीच हमालांना खुशाली म्हणून पैसे देऊन गेले, अशी बतावणी आता शासकीय यंत्रणांमधील मंडळी करीत आहे. 

प्रतिक्रिया
शासन शासकीय कापूस खरेदी केंद्रात बैलगाडीतूून आलेला कापूस उतरविण्यासाठी निर्धारित निधी मजुरीपोटी देते. हंगामाच्या अखेरिस असा निधी सबंधित खरेदीदार यंत्रणेला दिला जातो. परंतु हमालांच्या नावाखाली सीसीआयच्या केंद्रांवर कापूस उतरविण्याच्या मजुरीचे पैसे उपटले गेल्याच्या तक्रारी आहेत. यासंबंधी यंत्रणांची चौकशी झाली पाहीजे. बाजार समितीची ती जबाबदारी आहे. 
- संजय पवार, पणन संचालक

इतर बातम्या
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
निफाड तालुक्‍यात द्राक्ष काढणीला सुरवातनिफाड, जि. नाशिक  ः तालुक्‍यातील उगाव,...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : यंदाच्या दुष्काळी स्थितीमुळे नांदेड,...
शेतकऱ्यांना साह्यभूत नवनव्या योजना...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न...
येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा...परभणी : पूर्णा नदीवरील येलदरी धरण तसेच...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
थकीत पाच कोटी दिले तरच तूर खरेदीयवतमाळ ः खरेदी विक्री संघाचे थकीत कमिशन आणि...
पशुगणनेकरिता आता महिनाअखेरपर्यंत मुदतनागपूर   ः पशुगणनेसाठी पूरक साहित्याचा...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
ट्रायकोकार्ड निर्मिती प्रशिक्षण प्रकल्प...नागपूर ः कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील...
राज्य वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी जाणून...औरंगाबाद :  राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष व्ही...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...