agriculture news in Marathi, Farmers are in trouble due to district bank recovery, Maharashtra | Agrowon

नाशिक जिल्हा बँकेच्या वसुलीमुळे शेतकऱ्यांमध्ये तणाव
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 मार्च 2018

नाशिक: सततच्या नैसर्गिक आपत्तीने पिके घशात घातली. जे हाती आलं त्याला बाजारात दर मिळेना. यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतीतून हाती काहीच येत नसताना जिल्हा बॅंकेने कर्जवसुली सुरू केली आहे. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकरी व मुलाने विष प्राशन केले, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

नाशिक: सततच्या नैसर्गिक आपत्तीने पिके घशात घातली. जे हाती आलं त्याला बाजारात दर मिळेना. यामुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. शेतीतून हाती काहीच येत नसताना जिल्हा बॅंकेने कर्जवसुली सुरू केली आहे. याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कर्जवसुली पथकासमोरच कर्जदार महिला शेतकरी व मुलाने विष प्राशन केले, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.  

 दरम्यान, कर्जदार महिला व तिच्या मुलास नाशिकरोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जिल्हा बॅँकेचे कर्जवसुली पथक पांढुर्ली येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाजे मळ्यात गेले होते. या वेळी कर्जदार कुटुंबीय व वसुली पथक यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर कैलास मुकुंद वाजे (३२) याने वसुली पथकासमोरच विष प्राशन केल्याचे समजते. या वेळी त्याची आई सुलोचना मुकुंद वाजे यांच्याही अंगावर व तोंडात विष गेल्याचे कळते. या दोघांनाही त्यामुळे विषबाधा झाली. दोघांना नाशिकरोड येथील संतकृपा रुग्णालयात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

पांढुर्ली येथील सुलोचना मुकुंद वाजे यांनी विकास संस्थेकडून २००६ मध्ये कर्ज घेतले आहे. या कर्जवसुलीसाठी जिल्हा बॅँकेचे कर्जवसुली पथक इनोव्हा कार (क्र. एमएच १७ व्ही ९६९५) घेऊन गेले होते. या वेळी उभयतांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे समजते. कैलास वाजे यांनी पथकासमोरच विष घेतले व आई सुलोचना यांच्याही तोंडात विष गेल्याचे कळते. या वेळी कैलास यांच्या लहान भावाने वसुली पथकाच्या वाहनावर दगड फेकल्याने काच फुटली. याप्रकरणी जिल्हा वसुली पथकातील अधिकाऱ्याने वाहनाचे नुकसान झाल्याची फिर्याद सिन्नर पोलिस ठाण्यात दिली.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...