agriculture news in Marathi, farmers are in trouble due to load shedding in Buldana District, Maharashtra | Agrowon

भारनियमनामुळे शेती ऑफलाइन
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 डिसेंबर 2017

शासनाने ऑनलाइनची किचकट प्रक्रिया अमलात आणल्या पासून शेतकऱ्यांचा वेळ हा सातबारा, आठ-अ काढण्यात व वेगवेगळ्या  प्रकारच्या अर्जाची पूर्तता करण्यात जात असल्याने शेतकरी वर्गाचे शेती व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांना ऑनलाइन करून शेती व्यवसाय  ऑफलाईन करण्यासारखा हा प्रकार आहे.लोडशेडिंग ठीक आहे. पण ते रात्री करा. दिवसा जी काही वीज द्यायची ती शेतकऱ्यांना द्या.
- शिवदास वनारे, धानोरा(जं) ता.नांदुरा.
 

नांदुरा, जि. बुलढाणा : शासनाने सर्व योजनांचे व्यवहार ऑनलाइन केले आहेत. ऑनलाइनच्या जमान्यात सर्वात जास्त त्रास हा शेतकरी वर्गाला होत आहे. छोट्यामोठ्या कारणासाठीही शेतकऱ्यांना ऑनलाइनच्या कसोटीत उतरावे लागत आहे. एकीकडे त्याला ऑनलाइनच्या उंबरठ्यावर उभे केले असतांनाच त्याची ऐन उत्पन्नवाढीसाठी आवश्यक असणारी वीज मात्र लोडशेडिंगच्या नावाखाली कमी करून शेतकऱ्यांची शेती मात्र ऑफलाइन करण्यात येत आहे. 

आजच्या आधुनिकरणाच्या संगणकीय युगात मोठी क्रांती झाली असल्याने सर्व व्यवहार हे ऑनलाईन पध्दतीने होत असून शेतकऱ्यांना अर्ज भरण्यापासून तर कर्ज भरण्यापर्यंतच्या (कर्जमाफीच्या) सर्व प्रक्रिया याच माध्यमातून पार पाडाव्या लागत आहे. ऑनलाईन प्रक्रियेची पध्दत अजून शेतकऱ्यात रुजली नसल्याने त्यांना अनेक अडचणीतून ऑनलाइनच्या रांगेतच वेळ गमवावा लागत आहे. पर्यायाने याच कारणामुळे त्याचे दिवसभराचे शेतीचे काम बुडत असल्यामुळे त्याच्या उत्पन्नवाढीवर पाणी फेरल्या जात आहे.

त्यातच आठवड्यातून चार दिवस रात्रीची वीज  वेळापत्रकाचे कोणतेही भान न ठेवता दिल्या जात असल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. सध्या शेतीसाठी आठ तास वीज पुरवठा होत असताना रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वीज वितरण कंपनी कधी सहा तर कधी पाच तासच वीज पुरवत असल्याचे  शेतकरी बोलून दाखवत आहेत.

सद्या रब्बी पिकाच्या गुलाबी थंडीत शेतकऱ्यांना जीवाची पर्वा न करता पिकांना जगविण्यासाठी रात्र जागून काढावी लागत आहे. त्यातच ही वीजही शक्यतो ऑफलाईन राहत असल्यामुळे ‘‘रातभर जागले परंतु हाती काहीच नाही लागले’’ सारखी गत शेतकऱ्यांची होत आहे. त्यामुळे अर्ज भरण्यात शेतकरी दिवसभर ऑनलाइनच्या रांगेत दिसत असला तरी रात्रीच्या होणाऱ्या जास्तीच्या लोडशेडिंगमुळे पूर्ण जीवनातूनच ऑफलाइन होतो की काय अशी अवस्था शेतकरीवर्गाची सद्या झाली आहे.

प्रतिक्रिया
ऑनलाइन अर्ज करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. यासाठी शासनाने शेतकऱ्याचे सर्व प्रोग्राम ऑनलाईन करावे. हे सर्व करीत असताना शेतकऱ्यांची वीज मात्र  ऑफलाईन करू नये. लोडशेडिंग करायचेच तर रात्रीचे करा, दिवसभर मात्र शेतकऱ्यांना वीज द्या. जीवाची पर्वा न करता, रात्री-बेरात्री पिकांना पाणी देवुन शेवटी शेतकरी हा कर्जबाजारीच झाला आहे.
- बळीराम कोल्हे, वळती बु. जि. बुलडाणा

इतर ताज्या घडामोडी
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...
शेतीमालाच्या साठवणुकीसाठी उभारणार गोदामेकऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला...