agriculture news in Marathi, farmers are in trubel due to production of pink bollworm instead of cotton, Maharashtra | Agrowon

कापसाऐवजी बोंड अळीचेच पीक; शेतकरी हतबल
टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 डिसेंबर 2017

मी चार एकरांत प्री-मॉन्सून कपाशीची ठिबकवर लागवड केली. दरवर्षी जेथे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत उतारा राहायचा तेथे या वर्षी अवघा एकरी पाच क्विंटल कापूस झाला. अाताही कपाशीवर बोंड्या होत्या. मात्र प्रत्येक बोंडात अळी असल्याने कापूस वेचणे कठीण झाले होते. त्यामुळे ही कपाशी उपटून फेकली. जेमतेम खर्चसुद्धा निघू शकलेला नाही.
- सुरेंद्रसिंग जाधव, टाकरखेड, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यात पंधरा हजारांवर तक्रार अर्ज 
बुलडाणा  : बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशीचे उत्पादन केवळ १० ते २० टक्क्यांवर अाले अाहे. शिवाय निघत असलेला कापूससुद्धा चांगल्या दर्जाचा नसल्याने दरही कमी मिळत आहेत. बोंड अळीने नुकसान झाल्याबाबत शेतकऱ्यांडून कृषी विभागाकडे अर्ज केले जात असून, अातापर्यंत १५ हजारांपेक्षा अधिक अर्ज दाखल झाले असून, दररोज अर्जांची संख्या वाढतच आहे. यावरूनच बोंड अळीच्या नुकसानीची तीव्रता स्पष्ट होत अाहे.  

जिल्ह्यात या हंगामात पावणेदोन लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली अाहे. मागील वर्षी कपाशीला चांगले दर मिळाल्याने शेतकरी या पिकाकडे वळाले होते. काहींनी प्री-मॉन्सून लागवड केली, तर काहींनी पुरेसा पाऊस पडल्यानंतर लागवड केली. कपाशीचे पीक सुरवातीच्या काळात चांगले दिसत असतानाच बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला. प्रत्येक बोंडामध्ये अळी शिरल्याने कपाशीच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. 

जिल्ह्यात बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मलकापूर, खामगाव, नांदुरा, मोताळा, संग्रामपूर, जळगाव जामोद अादी सर्वच तालुक्यांतील कपाशीच्या पिकावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झालेला अाहे. यामुळे शेतकरी पूर्णतः धास्तावले अाहेत. कृषी विभागाकडे नुकसानीबाबत अर्जांचा खच तयार होत अाहे. दर दिवसाला दोन ते अडीच हजार शेतकरी अर्ज सादर करीत अाहेत. अर्ज देण्यासाठी कृषी विभागात गर्दी होत अाहे.

शेतकऱ्यांचे बोंड अळीमुळे पूर्णतः नुकसान झाले अाहे. लागवड खर्चही निघालेला नाही. अालेल्या तक्रारींपैकी काहींच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणीसाठी कृषी विभागाचे कर्मचारी जात अाहेत. परंतु ग्रामपातळीवर काम करणाऱ्यांची संख्या कमी असल्याने ताण निर्माण झाला अाहे.

यवतमाळ जिल्‍ह्यात ३४ हजार तक्रारी

यवतमाळ : कापसावर आलेल्या बोंड अळीने शेतकरी संकटांत सापडले आहेत. बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील दोन लाख हेक्‍टरवरील पीक प्रभावित झाले आहे. गुरुवार (ता. ३०) पर्यंत जिल्ह्यातील तब्बल ३४ हजार शेतकऱ्यांनी बोंड अळीबाबात कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. विशेष म्हणजे याबाबत अजूनही पंचनामे करण्याचे आदेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात यंदा साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड झालेली आहे. त्यातील तब्बल ९० टक्के क्षेत्रावर बीटीची लागवड आहे. मात्र, यंदा बोंड अळीने कहरच केला. बीटीवर आलेल्या बोंड अळीने जिल्ह्यातील दोन लाख हेक्‍टरवरील पीकबाधित झाले. परिणामी, शेतकरी अडचणीत सापडले आहेत. बोंड अळीच्या आक्रमणामुळे कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. असे असतानाही अद्याप पंचनामे करण्याचे आदेश न आल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

बोंड अळीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. त्यानंतर आतापर्यंत तब्बल ३४ हजारांवर शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. ‘जी’ नमुन्यात या तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे या तक्रारींची तपासणी केली जाणार आहे. मात्र, अद्याप पंचनामा करण्याचे आदेश न आल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे.

फवारणी प्रकरणात बीडीओंना नोटीस
जिल्ह्यात फवारणीमुळे विषबाधा झालेल्या शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे. त्यानंतर फवारणीचा १६ गटविकास अधिकाऱ्यांना खुलासा मागण्यात आला होता. मात्र, ‘बीडीओ'' यांनी अहवाल न दिल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सिंगला यांनी कारणे दाखवा नोटीस (शोकॉज) दिली आहे. 

‘शोकॉज’चे सोपस्कार
फवारणी प्रकरणात चौकशी झाली, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वगळता इतर कोणावरही या प्रकरणात कारवाई झाली नाही. त्यामुळे ‘शोकॉज’ हे सोपस्कार असल्याची टीका होत आहे.

इतर अॅग्रो विशेष
झळा दुष्काळाच्या : शेतशिवार सुने......झळा दुष्काळाच्या ः जिल्हा औरंगाबाद गरज...
पाण्याचे राजकारण कोणीही करणार नाही ः...पुणे: राज्यातील गावा-गावांतील सामान्‍य...
नाशिकच्या आठ तालुक्यांत दुष्काळाचे संकटनाशिक : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून...
कृषी 'सेवापुलिंग'चे सर्व आदेश रद्दपुणे : कृषी खात्यातील काही महाभागांनी राज्य शासन...
भाताच्या खोडकिडी ल्यूर पाकिटात...चंद्रपूर ः भातावरील खोडकिडीचे पतंग आकर्षित व्हावे...
ग्रामपंचायतींमध्ये पीकनिहाय कृषी संदेश...पुणे: बोंड अळी तसेच पावसाचा खंड असल्यामुळे...
शेतकरी नवराच हवा गं बाई... कोल्हापूर : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणून...
कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात...पुणे : कोकणाच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मध्य...
‘एमएसीपी’चे फलित काय ?पुणे : जागतिक बॅंकेकडून सुमारे ४५० कोटी रुपयांचे...
एकशेपंचवीस प्रकारच्या देशी बियाणांचा...काळा गहू, काळा हुलगा, लाल उडीद, पांढरे कारळे, साठ...
स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर...निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि...
केरळला १०० कोटींची मदतकोची : केरळमधील पूरग्रस्त भागाची आज हवाई...
वानरांचा बंदोबस्त करणार कसा? माकडे आणि वानरे हजारो वर्षांपासून जंगलामध्ये,...
योजना चांगली, पण...हा य व्होल्टेज डिस्ट्रिब्युशन सिस्टिम (एचव्हीडीएस...
क्रॉपसॅप निरीक्षणाला अधिकाऱ्यांचा ‘खो'नागपूर ः क्रॉपसॅप प्रकल्पाअंतर्गत आठवड्यातून दोन...
‘दीडपट हमीभाव’प्रश्‍नी जनहित याचिकामुंबई: केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी शेतीमालाला...
मॉन्सूनच्या काळात ७१८ जणांचा मृत्यूनवी दिल्ली ः देशात यंदाच्या माॅन्सूच्या काळात...
मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा...औरंगाबाद : पावसाळा सुरू असला तरी पाऊसच पडत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा अंदाजपुणे : राज्यात दडी मारलेल्या पावसाला पुन्हा...
वर्धा जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीचा...वर्धा ः जून महिन्यात लागवड करण्यात आलेल्या कपाशी...