agriculture news in marathi, Farmers Army now to fight for agricultural reasons | Agrowon

शेतीप्रश्‍नी लढ्यासाठी आता किसान आर्मी
टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

नागपूर : शेतीप्रश्‍नांवर सरकारसोबत आरपारच्या लढाईसाठी आता लढवय्या आणि मोजक्‍याच शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या किसान आर्मीची स्थापना केली जाईल. आत्महत्येचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांनी या आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांनी प्रत्येकवेळी शेतकरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ततादेखील सरकार करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत साततत्याने वाढ होते.

नागपूर : शेतीप्रश्‍नांवर सरकारसोबत आरपारच्या लढाईसाठी आता लढवय्या आणि मोजक्‍याच शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या किसान आर्मीची स्थापना केली जाईल. आत्महत्येचा विचार करत असलेल्या शेतकऱ्यांनी या आर्मीत सहभागी होण्याचे आवाहन अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केले आहे.

राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार आले तरी त्यांनी प्रत्येकवेळी शेतकरी प्रश्‍नांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्ष केले. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांची पूर्ततादेखील सरकार करीत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत साततत्याने वाढ होते.

आंदोलन, उपोषण आणि मोर्चे याचाही सरकारवर परिणाम होत नाही. त्यामुळे शेतीप्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी शत्रुशी युद्धकर्त्या सैन्याच्या धर्तीवर किसान आर्मीची उभारणी केली जाईल, अशी माहिती आमदार कडू यांनी बोलताना दिली. किसान आर्मीत आत्महत्येचा विचार असणाऱ्या शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. मरणापेक्षा लढणे केव्हाही योग्य, असा संदेश त्यांना दिला जाणार असल्याचे सांगितले.

सरकारला वर्षभराचा ''अल्टिमेटम''
शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ केली. परंतु त्यांना हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थितीत गेल्या अनेक वर्षात बदल झाला नाही. ही परिस्थिती बदलण्याचा आमचा प्रयत्न राहील. सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर वर्षभरात कोणताच निर्णय घेतला नाही, तर किसान आर्मी आपल्या कामकाजास सुरवात करेल, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

शेतीप्रश्‍नांवर लढवय्या शेतकऱ्यांचे हे संगठण राहील. त्याचे नामकरण किसान आर्मी असे करण्यात आले आहे. आत्महत्येच्या विचारात असलेल्या शेतकऱ्यांना यात सहभागी करून घेतले जाईल. सैन्याप्रमाणे हे शेतीप्रश्‍नी आक्रमक लढा देतील. त्यामुळेच आर्मी शब्दप्रयोग वापरला आहे.
- बच्चू कडू, आमदार,
अचलपूर-परतवाडा मतदारसंघ

इतर बातम्या
जळगावच्या पालकमंत्र्यांचा दौरा पुन्हा...जळगाव : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा...
खानदेशातील पाणीटंचाई गंभीरजळगाव : खानदेशात पाणीटंचाई दिवसेंदिवस बिकट होत...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
खानदेशात अनियमित वीजपुरवठाजळगाव : खानदेशात जलपातळी सातत्याने घटत आहे....
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
नाशिक येथे साकारणार 'देवराई' नाशिक : दुर्मीळ देशी प्रजातींच्या वृक्षांचे...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
जनावरांची तडफड, लोकांचा पाण्यासाठी टाहोसोलापूर ः राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करून जवळपास...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
‘गुणनियंत्रण’विरोधात विखेंचेही पत्र पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण...
राज्य बॅंकेकडून साखरेच्या मूल्यांकनात...कोल्हापूर : केंद्राने खुल्या साखरेचे किमान विक्री...
राज्यात उद्या हलक्या पावसाची शक्यतापुणे: वेगाने बदलणारे वातावरण, वाऱ्यांच्या...
प्रेरणा प्रकल्पातून ९० हजार शेतकऱ्यांचे...मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त १४...
कांद्याच्या ढिगाऱ्यात बुजवून घेत...नाशिक  : कमी पाऊस, दुष्काळी परिस्थिती व...