agriculture news in Marathi, farmers association of organic producers will establish in the state, Maharashtra | Agrowon

सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकरी संघाची स्थापना होणार
टीम अॅग्रोवन
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

पुणे : सेंद्रिय शेतीमाल उत्पादनाच्या चळवळीला दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेतकरी संघाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील ९३२ सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गटांना संघटित ताकद मिळण्याची शक्यता आहे. 

शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सेंद्रिय शेतमाल उत्पादकांच्या गटांची बांधणी करण्याची जबाबदारी कृषी खात्याच्या ‘आत्मा’कडे देण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांचे गट मोठ्या प्रमाणात स्थापन झाले. मात्र शेतीमालाची बाजारपेठ तयार करण्याबाबत फारसे काम झालेले नाही. 

पुणे : सेंद्रिय शेतीमाल उत्पादनाच्या चळवळीला दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेतकरी संघाची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील ९३२ सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गटांना संघटित ताकद मिळण्याची शक्यता आहे. 

शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच सेंद्रिय शेतमाल उत्पादकांच्या गटांची बांधणी करण्याची जबाबदारी कृषी खात्याच्या ‘आत्मा’कडे देण्यात आलेली आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यात सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांचे गट मोठ्या प्रमाणात स्थापन झाले. मात्र शेतीमालाची बाजारपेठ तयार करण्याबाबत फारसे काम झालेले नाही. 

‘‘माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांच्या झालेल्या बैठकीत सेंद्रिय उत्पादनाचा ब्रॅंड बनविण्याचे ठरले आहे. त्यामुळे या संकल्पनेला दिशा देण्यासाठी आता पुढचा टप्पा महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकरी संघाची स्थापना करण्याचा राहील,’’ असे आत्माचे प्रकल्प संचालक सुनील बोरकर सांगितले. 

‘‘सेंद्रिय शेतीमालाची बाजारपेठ तयार होण्यासाठी सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकऱ्याला स्वतःची ओळख महत्त्वाची होती. मात्र केवळ व्यक्तिगत ओळख नसून उपयोगाचे नव्हते, तर गट म्हणूनदेखील ओळख लागते. गटाच्या वतीने शेतीमालाचे मार्केटिंग करताना जास्त फायदे मिळतात. त्यामुळेच सेंद्रिय शेतीमालाच्या प्रमाणीकरणासाठी आम्ही सहभाग हमी पद्धत (पीजीएस) आणली. त्यामुळे ९३२ गट तयार होऊ शकले,’’ असे श्री. बोरकर यांनी स्पष्ट केले. 

सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांसाठी सध्या अपेडाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून प्रमाणीकरण केले जाते. त्याचा लाभ निर्यातक्षम व देशांतर्गत अशा दोन्ही बाजारपेठेत होतो. मात्र सहभाग हमी पद्धत (पीजीएस) केवळ देशांतर्गत बाजारासाठी उपयुक्त असून, त्याची नोंदणी स्वतः शासनाकडून शेतकरी गटाला दिली जाते. ही नोंदणी कमी खर्चात होते. 

पुण्यात सेंद्रिय शेतीमाल उत्पादकांसाठी बाजारपेठा तयार करण्यासाठी काही खासगी वसाहती निवडण्यात आलेल्या आहेत. मात्र राज्याच्या इतर जिल्ह्यात देखील बाजारपेठा तयार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सेंद्रिय शेतकरी संघ उपयुक्त ठरणार आहे. या संघाच्या बांधणीसाठी कृषिक्रांती फार्मर्स क्लबचे अध्यक्ष अंकुश पडवळे व बारामती फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे प्रयत्नशील असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पणन मंडळाच्या सहभागाची शक्यता
सेंद्रिय शेतीमाल उत्पादक शेतकरी वर्गासाठी भविष्यात बाजारपेठेची बांधणी करताना या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचा सहभाग हवा, अशी सूचना श्री. शरद पवार यांनी केली आहे. या समस्येबाबत सहकार व पणन मंत्रालयासमवेत बैठक घेण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी श्री. पवार यांनी केली आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीमालाच्या बाजारपेठविषयक समस्या सुटण्यासाठी चालना मिळेल, असे कृषी खात्याचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
आश्‍वासनानंतर कडू यांचे विमा आंदोलन...पुणे : फळ पीकविमा योजनेतील गलथानपणामुळे...
वैशिष्ट्यपूर्ण, मूल्यवर्धित उत्पादनांत...औरंगाबाद येथील सौ. मनीषा संतोष चव्हाण यांनी...
मुंबईमध्ये शेतकरी ते ग्राहक सेंद्रिय...नाशिक : सिन्नर तालुक्यात दुष्काळी परिस्थिती...
अकोली जहाॅंगीर येथे एचटीबीटी...अकोला ः देशात प्रतिबंधित असलेले एचटीबीटी कापूस...
कर्नाटक आगमनानंतर, मॉन्सूनच्या...पुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
सांगली जिल्ह्यात बेदाणा उत्पादनात वाढ,...सांगली ः बेदाणा निर्मितीसाठी प्रतिकूल वातावरण...
तिसऱ्या दिवशीही समुद्राला उधाणसिंधुदुर्ग : वायुवादळामुळे समुद्राला आलेले...
खरीप हंगामासाठी भेंडीची नवी जातचिपळूण ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
कोकणात बरसणार पूर्वमोसमीच्या सरीपुणे : ‘वायू’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणात...
दुष्काळ सांगतो ‘जपून वापरा पाणी’हवामानाच्या नुकत्याच व्यक्‍त झालेल्या अंदाजानुसार...
‘असर’दार शिक्षणासाठी...कृषी पदवीधर आता माध्यमिक शिक्षकांच्या नोकरीसाठी...
मॉन्सूनची दक्षिण कर्नाटकपर्यंत चालपुणे : अरबी समुद्रातील ‘वायू’ चक्रीवादळामुळे...
गुजरातवरील ‘वायू' संकट तूर्त टळलेअहमदाबाद/ नवी दिल्ली : गुजरात किनाऱ्याच्या दिशेने...
मोगरा शेतीतून दरवळला यशाचा सुगंध...ॲग्रोवनमध्ये मोगरा शेतीची यशकथा वाचून कवठेमहांकाळ...
‘राजवाडी पॅटर्न’द्वारे शंभर एकर जमीन...पावसाळ्यात भरपूर पाऊस, उन्हाळ्यात पाण्याचे...
छत्रपती शाहू महाराज यांनी...कागल, जि. कोल्हापूर ः महाराष्ट्रात राजर्षी शाहू...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज पुणे ः अरबी समुद्रात धुमाकूळ घालणाऱ्या वायू...
'पशुसंवर्धन'मध्ये अखेर नव्याने बदल्यानागपूर ः विश्‍वासात न घेताच बदल्या केल्याचा ठपका...