agriculture news in marathi, farmers award distribution in february, jalgaon,maharashtra | Agrowon

जळगाव झेडपीचे कृषी पुरस्कार फेब्रुवारीमध्ये देण्याचा निर्णय
टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 डिसेंबर 2017
जिल्हा परिषदेचे कृषी पुरस्कार फेब्रुवारीत प्रदान केले जातील. पुरस्काराचे स्वरूप, तारीख व इतर मुद्द्यांबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतले जातील. प्रस्ताव मागविण्यास लवकरच सुरवात होईल. 
- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद
जळगाव ः जिल्हा परिषदेचे कृषी पुरस्कार येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रदान करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या पुरस्कारांसंबंधी तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांतर्फे प्रस्ताव स्वीकारले जाणार आहेत. 
 
जिल्हा परिषदेचे कृषी पुरस्कार वितरण चार वर्षांपासून बंद असल्याचा मुद्दा अॅग्रोवनने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून उपस्थित केला होता. त्यासाठी निधी नसल्याचेही वृत्तात म्हटले होते. त्याची दखल जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने लागलीच घेऊन पुरस्कारांसाठी तरतूद करण्याबाबत कार्यवाही हाती घेतली.
 
यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी कृषी विभागाकडे पाठपुरावाही केला होता. जिल्हा परिषदेने या पुरस्कारांसाठी दोन लाख रुपयांची तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून (सेस फंड) ही तरतूद केली आहे. अर्थसंकल्प सुधारित करताना (रिव्हाइज) ही तरतूद प्रशासनाकडून झाली आहे. प्रत्येक तालुक्‍यातून एका शेतकऱ्यास पुरस्कार दिला जाईल. तज्ज्ञ समिती पुरस्कारांच्या प्रस्तावांबाबत पडताळणी, तपासणी करेल. प्रस्ताव तालुका स्तरावर पंचायत समितीमध्ये कृषी विस्तार अधिकारी व इतर कृषी कर्मचारी स्वीकारतील. तज्ज्ञ समिती जिल्हा स्तरावर त्यासंबंधी कार्यवाही करणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने स्पष्ट केले.
 
पुरस्कार वितरणासाठी शासनाचेच प्रतिनिधी असतील. त्यासंबंधीचे नियोजन जिल्हा परिषदेचा कृषी विभाग करीत असून, या कामात राज्य शासन कृषी विभाग म्हणजेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचीदेखील मदत घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...