agriculture news in Marathi, farmers beaten in weekly market, Maharashtra | Agrowon

शेतकरी आठवडे बाजारचालक शेतकऱ्यांना गुंडांकडून मारहाण
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे चालविण्यात येणाऱ्या शेतकरी आठवडे बाजारात काही गुंडांनी भाजीपाला विक्रीस मज्जाव करत शेतकऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार नगर येथील कोरडवाहू उत्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

पुणे : शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने बाणेर येथे चालविण्यात येणाऱ्या शेतकरी आठवडे बाजारात काही गुंडांनी भाजीपाला विक्रीस मज्जाव करत शेतकऱ्यांना मारहाण केल्याची तक्रार नगर येथील कोरडवाहू उत्थान फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दिली आहे. 

बाजार आयोजक सागर उरमुडे यांनी तक्रारीत म्हटले आहे, की आमच्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने आम्‍ही गेली २-३ वर्षे बाणेर येथील गणराज चौकातील गेरा सोसायटी येथे दर रविवारी दुपारी ३ ते ९ पर्यंत शेतकरी आठवडे बाजाराचे आयोजन करत आहोत. मात्र, रविवारी (ता. ३) रात्री स्थानिक बादल पवार, आकाश पवार यांनी आम्हाला तुम्ही स्वतः बाजार चालवताय, तुम्ही कंपनी सभासद नाही, त्यामुळे तुम्ही आमच्या बाजारात भाजीपाला विक्री करू नये, असे सांगत मला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. 

तसेच, आठवडे बाजार चालवणारे सगळे नगरसेवक माझ्या खिशात आहेत, तुझे सगळे बाजार बंद करून आम्ही चालवणार आहोत, अशी धमकी दिली. तुमची कंपनी नगरमधील आहे आणि तुम्ही नगरमधून येऊन आमच्या पोटावर पाय देत आहात. तुम्हाला परत नगरला पाठवणार अशा प्रकारच्या धमक्या देण्यात आल्याची उरमुडे यांनी तक्रार दिली आहे. 

दरम्यान, या स्थानिकांनी शिवशंभो फार्मर्स प्रोड्युसर नावाच्या बोगस कंपनीद्वारे आठवडे बाजार सुरू असून, यासाठी त्यांनी स्थानिक नगरसेवकांना पैसे दिल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. हातगाडी धारकांकडून २५ हजार रुपये हे लोक स्टॉलला घेत आहेत. यांच्यावर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ आणि पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई करावी, अशी मागणी उरमुडे यांनी केली आहे.  

या तक्रारीचा तपास चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे हवालदार बी. आर. ताथवडे करीत आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
नवसंकल्पना ठीक; पण... राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे राज्यात ‘...
उत्पन्न दुपटीसाठी आत्ताही अपुरे उपाय दर्जेदार बियाणांची उपलब्धता  शेतकऱ्यांना...
सौर कृषिपंप योजनेतील लाभार्थी हिस्सा...मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत...
कृषी विभागात बदल्यांची धूमपुणे  : राज्यात ऐन खरिपाच्या नियोजनात कृषी...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
पावसाचा प्रत्येक थेंब जिरवा ः...पुणे  ः पावसाच्या पाण्याचे विविध प्रयोगांनी...
मॉन्सून आज कोकणात?पुणे  : अरबी समुद्रात आलेल्या ‘वायू’...
ग्रामविकासाचा आदर्श झालेले वडगाव पांडे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या...
राज्यात डाळिंबाचा मृग बहर अडचणीतसांगली ः राज्यात डाळिंबाचे क्षेत्र एक लाख ३० हजार...
कोकणात पाऊस जोर धरणारपुणे  : मॉन्सूनच्या आगमनास पोषक स्थिती...
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
मक्यावरील लष्करी अळीचे एकात्मिक नियंत्रणमहाराष्ट्रात फॉल आर्मी वर्म (स्पोडोप्टेरा...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...
‘सबसरफेस ड्रीप’ तंत्राने  ऊस, टोमॅटोची...शेततळ्यातले जेमतेम पाणी आणि उपलब्ध पाण्याचा योग्य...
कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजपुणे   : राज्यातील मॉन्सूनचे आगमन...
जुनीच वाट की नवी दिशाप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ...
कोरड्या महाराष्ट्रावर घोषणांचा पाऊसराज्यात सत्तेत आल्यानंतर शेतीतील गुंतवणूक वाढविली...
लोकसहभागातून नागरी पर्जन्यजल संधारण शक्यप्रत्येक जलस्रोताचे पुनर्भरण करून त्याचं बळकटीकरण...
बोंडअळी निर्मूलन प्रकल्पात आठ राज्यांचा...नागपूर : देशात सर्वात आधी गुजरात त्यानंतर...
लांबलेला पाऊस आणि नियोजनशून्य कारभारजूनचा पहिला पंधरवाडा उलटून गेला तरी राज्यात...