agriculture news in marathi, farmers become in trobule due to drought situation, aurangabad, maharashtra | Agrowon

दुष्काळाची व्यथा मांडताना महिला शेतकऱ्यास रडू कोसळले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍याच्या कणसात दाणेच नाहीत, तर वाढ न झालेल्या कपाशीला चार-पाच कैऱ्यांमुळे एकरी चाळीस-पन्नास किलो कापूस निघाल्यास खर्च कसा भागणार, अशी व्यथा मांडणाऱ्या गेवराई शेमी येथील महिला शेतकरी रुख्माबाई श्‍यामराव ताठे यांना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमोर अक्षरशः रडू कोसळले.

निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍याच्या कणसात दाणेच नाहीत, तर वाढ न झालेल्या कपाशीला चार-पाच कैऱ्यांमुळे एकरी चाळीस-पन्नास किलो कापूस निघाल्यास खर्च कसा भागणार, अशी व्यथा मांडणाऱ्या गेवराई शेमी येथील महिला शेतकरी रुख्माबाई श्‍यामराव ताठे यांना पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासमोर अक्षरशः रडू कोसळले.

दुष्काळाचे विदारक चित्र पाहून पालकमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुष्काळाबाबत गंभीर असून, लवकरच मदत घोषित करतील, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला. सिल्लोड तालुक्‍यातील निल्लोड महसूल मंडळातील दुष्काळ भागाची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता. १७) पालकमंत्री डॉ. दीपक सावंत औरंगाबाद जिल्ह्यात दाखल झाले. या वेळी आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देवयानी डोणगावकर, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे उपस्थित होते.

गेवराई शेमी, निल्लोड, चिंचखेडा, भवन या गावामधील औरंगाबाद-जळगाव महामार्गालगतच्या शेतात त्यांनी पाहणी केली. या वेळी शेतकऱ्यांसोबतच भाजप, कॉँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. दुष्काळ पाहणी दौऱ्यात कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार अब्दुल सत्तार हे त्यांच्या गाडीला पक्षाचा झेंडा लावून फिरत असल्याने हा कार्यक्रम पक्षाचा नसून, शासकीय दौरा असल्याचा आक्षेप भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी घेतल्यानंतर झेंडा काढण्यात आला. मात्र नेते दुष्काळाबाबत किती गंभीर आहेत, याची नागरिकांमध्ये चर्चा रंगली होती.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...