agriculture news in Marathi, farmers from buldana faces crop loan crises | Agrowon

काय आणि कसं पेरावं ?
गोपाल हागे
गुरुवार, 21 जून 2018

लाखनवाडा, जि. बुलडाणा ः लाखनवाडा येथे एेन खरीप हंगामाच्या तोंडावर बीएसएलएलची डाटा लिंक नसल्याने सर्वच जण वेठीस धरले गेले अाहेत. दुसरीकडे अशा प्रकारामुळे गतिशील कारभाराचे दाखले देणाऱ्या प्रशासनाचेही वाभाडे निघाले अाहेत. या बँकेत असलेले हजारो खातेदार १५ दिवसांपासून चकरा मारून कंटाळले अाहेत. तरीही यंत्रणा हलायला तयार नाही. काही दुर्घटना होऊ नये यासाठी बँक प्रशासनाकडून मात्र पोलिस बंदोबस्त घेण्यात अाला.

लाखनवाडा, जि. बुलडाणा ः लाखनवाडा येथे एेन खरीप हंगामाच्या तोंडावर बीएसएलएलची डाटा लिंक नसल्याने सर्वच जण वेठीस धरले गेले अाहेत. दुसरीकडे अशा प्रकारामुळे गतिशील कारभाराचे दाखले देणाऱ्या प्रशासनाचेही वाभाडे निघाले अाहेत. या बँकेत असलेले हजारो खातेदार १५ दिवसांपासून चकरा मारून कंटाळले अाहेत. तरीही यंत्रणा हलायला तयार नाही. काही दुर्घटना होऊ नये यासाठी बँक प्रशासनाकडून मात्र पोलिस बंदोबस्त घेण्यात अाला.

खामगाव तालुक्यातील लाखनवाडा हे राजकीय, सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे गाव मानले जाते. सातत्याने चर्चेत राहणारे हे गाव अाता बँकेतील व्यवहार बंद असल्याने, एकाही शेतकऱ्याला पीककर्ज मिळाले नसल्याने जिल्हाभर गाजते अाहे. खरीप हंगामाच्या तोंडावर लाखनवाडा गावात सध्या शासन व बँक यंत्रणांविरुद्ध दर दिवसाला रोष वाढत असल्याचे मंगळवारी (ता. १९) या ठिकाणी भेट दिली असता दिसून अाले. सकाळीच लाखनवाडा येथील बँक शाखेत गर्दी झालेली होती. काही जण बँक अधिकाऱ्यांशी तावातावाने वाद घालत होते. बँकेत एकच गोंगाट झालेला दिसून अाला. चौकशी केली तर जोराने बोलणारा खातेदार हा गेल्या अाठ दिवसांपासून पैशांसाठी चकरा मारत होता. अाजही त्याला पैसे मिळत नसल्याचे समजताच त्याचा पारा चढला होता. 

स्टेट बँकेच्या लाखनवाडा शाखेत जवळपास चार हजार शेतकरी खातेदार अाहेत. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीत यापैकी एक हजार शेतकऱ्यांची खाती निल झाली. तीन हजार शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही असे बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. अाजपर्यंत या शाखेत नव्याने पीककर्ज वाटप सुरुच झालेले नाही. रस्त्याच्या कामामुळे बीएसएनएलची केबल तुटली अाणि या बँकेत असलेली डाटालाइन बंद झाली. या एका कारणामुळे हजारो शेतकरी खातेदार सध्या प्रचंड मनस्ताप सहन करीत अाहेत. पंधरा दिवसात स्थानिक अधिकाऱ्यांनी दोन -तीन पत्रे बीएसएनएलला दिली. मंगळवारी या बँकेचे शाखा व्यवस्थापक स्वतः जिल्हा मुख्यालयी (बुलडाणा) गेलेले होते. 

बँका मनावर घेईनात
बुलडाणा जिल्ह्यात खरिपासाठी सुमारे १७४५ कोटींचे नियोजन करण्यात अाले. जूनच्या पहिल्या अाठवड्यापर्यंत सुमारे चार टक्केसुद्धा वाटप नव्हेत. दुसरा अाठवडा अखेरसुद्धा फारशी गती वाढलेली नाही. जिल्हा प्रशासन एकीकडे बँकांना पीककर्ज वाटपासाठी सातत्याने अावाहन करीत अाहे. मात्र कुठल्याही बँकेने याला मनावर घेतलेले नाही. या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थिती अद्यापही सक्षम झालेली नसल्याने पीककर्ज वाटपाचा भार राष्ट्रीयकृत बँकावर अाहे. या बँका कागदपत्र, नियमांची चाकोरी सोडायला तयार नाहीत. 

येथील बँकेत लिंक नसल्याने सध्या व्यवहार बंद अाहेत. मात्र हे नेहमीचे अाहे. जर बीएसएनएल बंद असेल तर दुसरे कनेक्शन घेऊन कामकाज व्हायला हवे. परंतु अधिकारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात.
- सत्यम पांढरे, युवा शेतकरी, लाखनवाडा

अाम्ही शेतकरी अधिकाऱ्यांना अामचे कर्ज किती माफ झाले हे विचारतो, तर कुणी सांगतही नाही. बॅंकेत किती दिवस चकरा माराव्यात. 
- शिवाजी पाटील, शेतकरी, लाखनवाडा खुर्द

मी पीककर्ज २५ हजार व पाइपलाइनसाठी ५० हजार रुपये कर्ज घेतले अाहे. कर्जमाफीची घोषणा झाली, मात्र अाम्हाला अद्यापही लाभ मिळालेला नाही. अाजवर लागलेल्या यादीत माझे नाव नाही.
- भास्कर थोरात, शेतकरी, दुधा
 

इतर अॅग्रो विशेष
कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा...राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ...
कौशल्य विकासातून गटशेतीसाठी शेतकरी...मुंबई ः शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर...
पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास...पुणे : राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने...
हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने...सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी...
खानदेशात कापूस लागवड वाढण्याचा अंदाजजळगाव : खानदेशात आगामी खरिपात कापूस लागवड किंचित...
अाॅनलाइन नोंदणी न झाल्यास शेतकरीच...अकोला ः शासनाच्या आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी...
संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावापुणे ः राज्य सरकारने संपूर्ण शेतीमाल...
कोरडवाहू फळ संशोधन कार्याला गती...परभणी: पोषण मूल्यांच्या सुरक्षिततेसाठी...
राज्यातील सत्तावीस कृषी महाविद्यालयांचे...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेची आदर्श...
दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी दोन...मुंबई : राज्यातील खरीप हंगाम २०१८ मध्ये...
विदर्भात उद्यापर्यंत पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी फेरोमोन...रासायनिक कीडनाशकांना किटक प्रतिकारक होत असून,...
परागकणांचा मागोवा घेण्याची कार्यक्षम...दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील...
खानदेशात पाणीटंचाईच्या प्रस्तावात वाढजळगाव : खानदेशात पाणीटंचाईचे प्रस्ताव वाढत आहेत....
कडाक्याच्या थंडीने गव्हाच्या विविध...सातारा ः येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठाचा दर्जा घसरलापुणे: राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
कणेरी मठावर देशातील पहिले डिव्हाइन...कोल्हापूर : हजारो फुलझाडांसह विविध प्रकारची...
आंध्र प्रदेशातील एका कंपनीचा परवाना `...नागपूर ः आंध्र प्रदेशातील एका बियाणे कंपनीच्या...
आणखी साडेचार हजार गावांमध्ये दुष्काळी...मुंबई : खरीप हंगाम २०१८ मध्ये राज्यातील ५०...
मराठवाड्यात आज पावसाचा अंदाजपुणे : कमाल तापमानात वाढ झाल्याने राज्यात...