agriculture news in Marathi, Farmers came forward for helping Jawans, Maharashtra | Agrowon

ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या कुटुंबीयांना मदत
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

'जय जवान, जय किसान'ची संकल्पना खऱ्या अर्थाने साध्य करण्याचा हा एक प्रयत्न आहे. यातून देशसेवा प्रगल्भ बनविण्याबरोबर शहिदांच्या कुटुंबीयांना आधार देण्याचे काम केले जाणार आहे. गावात लाखो टन ऊस विविध कारखान्यांना पाठविला जातो. याच उसातील एक रुपया जवानांसाठी दिला जाणार आहे. यातून देशप्रेमही वृद्धिंगत होईल. 
- सागर संभुशेटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी युवा आघाडी

कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्यांनी अनोखे मदत कार्य हाती घेतले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी तोडणी झालेल्या उसाला प्रतिटन ऊसामागे एक रुपयांची मदत जोडण्याची मोहीम सुरू केली आहे. जमलेला निधी शहिदांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द केला जाणार आहे. 

भाजीपाला उत्पादनातील अग्रेसर गाव म्हणून नांदणीकडे पाहिले जाते. मात्र, ऊसपट्टा अशीही गावाची ओळख आहे. सुपीक जमीन आणि कष्टाच्या तयारीमुळे गावातील भाजीपाला आणि ऊस शेतीमुळे एक सधन गाव म्हणून नांदणीकडे पाहिले जाते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी मदत करण्यासाठी तुटलेल्या प्रतिटन उसामागे एक रुपयांची मदत गोळा करण्याची संकल्पना पुढे आणली. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. 

स्वाभिमानीच्या या संकल्पनेला छोट्या मोठ्या सर्वच शेतकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांची वाताहात होऊ नये, यासाठी ही अनोखी मदतीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. यातून हजारो रुपये जमणार असून ही रक्कम शहीद कुटुंबीयांना दिली जाणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नांदणी शाखेचा १७ फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदाच्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. या वेळी देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी मदतीची संकल्पना मांडण्यात आली. या वेळी तुटलेल्या उसामागे एक रुपयांची मदत गोळा करण्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी काही शेतकऱ्यांनी याला प्रतिसाद देत मदतही दिली. पंधरा हजार रुपये बघता बघता जमले आणि मदतीचा ओघ सुरू झाला. 

 

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...