agriculture news in marathi, Farmers celebrated black diwali to protest government, Maharahtra | Agrowon

मळेगावात शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी !
सुर्यकांत नेटके
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

नगर ः सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहत नाही. शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करत मळेगाव (ता. शेवगाव) येथे शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी चटणी-भाकरी खाण्यात आनंद मानून शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. 

नगर ः सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे गांभीर्याने पाहत नाही. शेती आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना प्रभावी उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप करत मळेगाव (ता. शेवगाव) येथे शेतकऱ्यांनी दिवाळीच्या दिवशी चटणी-भाकरी खाण्यात आनंद मानून शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारच्या धोरणाचा निषेध केला. 

नगर जिल्हामधील शेतकरी सहा ते सात वर्ष शेतकरी आर्थिक संकटात आहे. विदर्भांतच नाही तर संपूर्ण राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. शासन त्यावर उपाययोजना करत नाही. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देण्याची सर्व स्तरांतून मागणी असताना त्याकडे तर दुर्लक्ष केले जात आहे. उलट जास्तीत जास्त शेतकरी कर्जमाफीपासून वंचित कसे राहतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची अत्यंत गरज असताना त्याबाबत आजीबाबत गांभीर्याने घेतले जात नसल्याचे शेतकरी विकास मंडळाचे म्हणणे आहे.

या सर्व मागण्यांसह कापसाला सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर द्यावा, शेतकऱ्यांच्या मुलांचे सर्व शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत सरकारने सकारात्मक विचार करण्याच्या गरज असताना, सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने, मळेगाव (ता. शेवगाव) येथे शेतकरी विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गावांतील मुख्य चौकात चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध करत काळी दिवाळी साजरी केली.

या वेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे, माजी सरपंच चंद्रकांत निकम, सुभाष दिवटे, श्रीकांत निकम, रावसाहेब देशमुख, नवनाथ आव्हाड, बापूराव राशीनकर, सुभाष शिंदे, सीताराम काकडे, दादासाहेब उगले, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. 

इतर ताज्या घडामोडी
सफरचंद काढणीसाठी रोबोट निर्मितीकरिता...तरुणांच्या सृजनशिलतेला चालना दिल्यास अनेक...
सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा...पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती...
आषाढी एकादशीनिमित्ताने पुण्यात...पुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
अचलपुरातील कारली पोचली थेट दुबईच्या...अमरावती : भाडेतत्त्वावरील शेतीत कारली लागवड करीत...
गडहिंग्लज तालुक्यात ओढ्याचे पाणी सोडले...कोल्हापूर : ओढ्यासारख्या नैसर्गिक स्त्रोतांचा...
परभणीतील १७ तलावांमधील पाणीसाठा...परभणी : जिल्ह्यातील २२ पैकी १७ लघू तलावांतील...
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीपातळीत...पुणे  : जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोटात...
तीन जिल्ह्यांत खरिपाची १४ लाख ८१ हजार...नांदेड  : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
दुधाचा दर वाढवून मिळाल्याने ‘स्वाभिमानी...सोलापूर : दुधाला वाढीव दराची मागणी करत स्वाभिमानी...
नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला...नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न...
समृद्धीसाठी सक्तीने भूसंपादनाचा प्रस्तावनाशिक  : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी...
माउली- सोपानदेव बंधुभेटीच्या सोहळ्याने...भंडी शेगाव - पंढरीच्या वाटचालीत वेळापूरचा...
कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटकनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
रविकांत तुपकर यांना पुण्यात अटकपुणे ः दूध आंदोलनादरम्यान पुणे शहरात जवळपास १० ते...
भात पिकातील एकात्मिक खत व्यवस्थापनभात पिकामध्ये हेक्टरी सरासरी उत्पादन कमी...
कर्जवाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांची...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना...
परभणीत पीकविमा वेबपोर्टलची गती धीमीपरभणी ः पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गंत...
उजनी धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ सोलापूर : पुणे जिल्ह्यातील पावसावर सोलापूर...
धरणसाठा वाढण्यासाठी जोरदार पावसाची... जळगाव  : जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
राज्य सरकारकडून केळी उत्पादकांची टिंगल...नागपूर : चक्रीवादळ आणि गारपिटीमुळे जळगाव...