शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘व्हीसी’द्वारे उद्‍घाटन

शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘व्हीसी’द्वारे उद्‍घाटन
शेततळ्याचे मुख्यमंत्र्यांनी केले ‘व्हीसी’द्वारे उद्‍घाटन

सोलापूर ः बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील सिद्राम बिराजदार यांनी सामुदायिक शेततळे योजनेतून शेततळे उभारून एकवीस एकर द्राक्ष बाग फुलवली आहे. शेततळ्याच्या जोरावर दुष्काळातही बाग फुलविणाऱ्या सिद्राम बिराजदार यांना सोमवारी (ता. १४) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाद दिली आणि त्यांच्या शेततळ्याचे उद्‍घाटन केल्याचे जाहीर केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमातून कृषी विभागाच्या लाभ घेतलेल्या राज्यभरातील लाभार्थींशी संवाद साधला. त्यामध्ये दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बोरामणी येथून थेट शेतावरून सिद्राम बिराजदार, जयशंकर बिराजदार यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातून अठरा शेतकरी लोकसंवाद कार्यक्रमात सहभागी झाले. 

श्री. बिराजदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेततळ्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक मदत केली, असे सांगितले. गेल्या वर्षी उभारलेल्या शेततळ्यातून यंदाच्या दुष्काळात आधार झाला, असे सांगितले. श्री. बिराजदार यांनी शेततळ्याचे उद्‍घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण दिले. त्यावर तुमच्या शेततळ्याचे उद्‍घाटन झाल्याचे जाहीर करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com