agriculture news in marathi, farmers companies do not have a clearity for tur procurement, akola, maharashtra | Agrowon

शेतकरी कंपन्यांना तूर खरेदीत ‘संधी’ परिपत्रकापुरतीच
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
अकोला   ः राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदी प्रक्रियेमध्ये संधी देण्याबाबत शासनाने परिपत्रक काढल्याने कंपन्यांमध्ये उत्साह वाढला होता; परंतु या परिपत्रकात स्पष्ट निर्देश नसल्याने शेतकरी कंपन्यांना ‘सुविधा कमी व अडचणीच जास्त’ अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत अाहे. जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या एका शेतकरी कंपनीने विक्रीसाठी नेलेली तूर खरेदी केंद्रावर वाहनातच पडून असल्याचे समोर अाले अाहे.    
 
शासनाने काढलेल्या परिपत्रकात राज्यात कार्यरत असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदी प्रक्रियेत सहभागी करून घेण्याबाबत स्पष्ट करण्यात अाले. या कंपन्यांनी त्यांच्या भागधारक शेतकऱ्यांची तूर स्वच्छ करून एफएक्यू दर्जाची बनवून तूर खरेदी केंद्रावर अाणावी, शासन ती खरेदी करेल असे सांगण्यात अाले.
 
यानुसार तेल्हारा तालुक्यातील एका शेतकरी उत्पादक कंपनीने सोमवारी (ता.२६) अापल्या भागधारक शेतकऱ्यांची तूर दोन वाहनांतून विक्रीसाठी नेली. खरेदी केंद्रावर गेल्यानंतर शासनाने काढलेल्या परिपत्रकातील गोंधळ समोर अाला.
 
कंपनीच्या प्रतिनिधीने या तुरीबाबत कंपनी ठरावासह संपूर्ण माहिती खरेदी केंद्रावरील व्यक्तींकडे दिली. ही तूर स्वच्छ करून एफएक्यू दर्जाची अाणल्याने मोजून घ्या असे सांगितले. मात्र, संबंधितांना ही तूर मोजणीपूर्वी संबंधित शेतकऱ्यांच्या नावे अाॅनलाइन नोंदणी करा, तुम्हाला त्यानंतर मेसेज येईल, असे सांगण्यात अाले. परिणामी शेतकऱ्यांची तूर सध्या खरेदी केंद्रावर पडून अाहे. शासनाने काढलेल्या परिपत्रकात मंत्रालय स्तरावर दुरुस्ती केली जात अाहे, असा सल्ला देण्यात अाला. 

परिपत्रक निघून अाता पंधरा दिवस पूर्ण झाले. हा शासन निर्णय घेतानाच त्यात अनेक गोष्टींची अस्पष्टता होती. त्यामुळे कंपन्यांच्या महासंघ प्रतिनिधींनी सचिवांची भेट घेत अापल्या मागण्या मांडल्या; परंतु त्यानंतर यामध्ये काहीही धोरणात्मक सुधारणा झालेली दिसत नाही.

जिल्हा यंत्रणांना कुठलेही सुस्पष्ट निर्देश नसल्याने ते कंपन्यांना अाॅनलाइन नोंदणी, मेसेजनंतर विक्रीसाठी तूर अाणा असा सल्ला देऊन मोकळे होत अाहेत. अाता शेतकऱ्यांची नोंदणी झाली तर किमान दोन महिन्यांनी नंबर लागेल अशी स्थिती अाहे. यामुळे शेतकरी कंपन्यांमार्फत विक्रीस अालेली तूर कधी मोजली जाईल, याची स्पष्टता नाही.

१५ एप्रिलनंतर हे खरेदी केंद्र किती दिवस सुरू ठेवले जातील हाही एक प्रश्नच अाहे. या अनुषंगाने शासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी केली जात अाहे.   

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...