agriculture news in marathi, farmers companies to get 50 percent subsidy on air transport | Agrowon

शेतीमाल विमान वाहतूक भाड्यात ५० टक्के अनुदान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 जून 2018

जम्मू काश्‍मीरसह ईशान्येकडील
राज्यांसाठी पणन मंडळाची याेजना

पुणे : राज्यात उत्पादित हाेणाऱ्या नाशवंत आणि अतिनाशवंत शेतीमालाला परराज्यांतील व्यापारास चालना देण्यासाठी पणन मंडळाने विमान वाहतूक दरामध्ये ५० टक्के अनुदान याेजना जाहीर केली आहे. याेजना पुढील सहा महिन्यांसाठी फक्त जम्मू काश्‍मीर आणि ईशान्य पूर्वेकडील विविध राज्यांसाठी असणार असून, महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्‍यांद्वारे शेतीमाल देशांतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. तर संंबंधित राज्यांतून शेतीमाल आणण्यासाठीदेखील ५० टक्के अनुदान असणार असून, यासाठी ५० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे.  

पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी माहिती दिली. श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यातील फळे भाजीपाल्यांना दुर्गम राज्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध हाेण्यासाठी विमान वाहतूक अनुदान याेजना राबविण्याबाबत विचार सुरू हाेता. नाशवंत शेतीमालाला अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध हाेऊन अधिकचे दर मिळण्यासाठी विविध प्रयत्न, उपक्रम, याेजना पणन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. महाराष्‍ट्रातून विविध शेतीमाल विविध राज्यांमध्ये पाठविला जाताे. मात्र जम्मू काश्‍मीरसह ईशान्येकडील विविध राज्यांचे रस्ते आणि रेल्वेद्वारे अंतर महाराष्ट्रापासून जास्त असल्याने या राज्यांमध्ये शेतीमाल जाण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच अंतर लांब असल्याने वाहतुकीमध्ये शेतीमाल खराब हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहतुकीचा कालावधी कमी करत, कमीत कमी वेळेत दर्जेदार माल बाजारपेठेत पाठविण्यासाठी थेट विमानाने शेतीमाल पाठविण्यासाठी प्राेत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.’’

विमान वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी पणन मंडळाद्वारे ही प्राेत्साहनपर याेजना लागू केली आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पणन मंडळाकडे नाेंदणी करणे आवश्‍यक असून, मंडळाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. तसेच शेतीमालाची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा तपशीलदेखील देणे बंधनकारक असणार आहे. असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

   अशी आहे याेजना 

  •  जम्मू काश्‍मीरसह मिझाेराम, आसाम, सिक्कीम, मेघालय, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर या राज्यांसाठी
  •  याेजना केवळ ६ महिन्यांसाठी प्रायाेगिक तत्त्वावर
  •  ५० लाख रुपये निधीची तरतूद
  •  किमान २२ टन शेतीमाल पाठविणे बंधनकारक 
  •  केवळ कार्गाे विमानानेच शेतीमाल पाठविणे बंधनकारक 
  •  संबंधित राज्यांमधून शेतीमाल आणण्यासाठी देखील ५० टक्के अनुदान 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात आले २५०० ते ६००० रुपये...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सिंदखेडराजा दुष्काळग्रस्त जाहीर कराअकोला : जिल्ह्यात या मोसमात तेल्हारा व अकोट या...
खान्देशातील धरणांत अल्प पाणीसाठा जळगाव : खान्‍देशातील तापी व पांझरा नदीवरील...
कोल्हापूरात धरणे भरली; नद्यांची...कोल्हापूर : केवळ पंधरा दिवसांतच जिल्ह्यातील...
जळगाव जिल्हा परिषदेत विरोधक शांत;...जळगाव : पोषण आहार, शिक्षक बदल्या यावरून जिल्हा...
नगर जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचे...नगर ः गेल्या अनेक दिवसांपासून गायब झालेला आणि...
भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची...भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात...
नगरमध्ये डाळिंबाच्या दरात पंचवीस...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दीड महिन्याच्या...
उरुग्वेतील गायीमधील लेप्टोस्पायरा...जगभरामध्ये प्राणी आणि मनुष्यामध्ये...
सागरी माशांच्या बिजोत्पादनाचे तंत्र...कोची येथील केंद्रीय सामुद्री मत्स्य संशोधन...
कोल्हापुरातील ११० गावांत कृत्रिम...कोल्हापूर : अनुवंशिक सुधारणा होऊन सशक्त जनावरांची...
पुणे विभागात ७३,७४० हजार हेक्टरवर...पुणे   ः  गेल्या साडेतीन महिन्यांत...
मराठवाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार...औरंगाबाद  : मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी...
पावसाअभावी वऱ्हाडात सोयाबीनचे उत्पादन...अकोला   ः या हंगामात वऱ्हाडात सर्वाधिक लागवड...
पुणे जिल्ह्यात महिनाभरात नऊ जणांचा...उरुळी कांचन, जि. पुणे : संपूर्ण राज्यात चिंतेचा...
मी 35-40 रूपयांनी पेट्रोल-डिझेलची...नवी दिल्ली : सध्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे मोदी...
लाल मातीचा सन्मान वाढविणारे आंदळकरकोल्हापुरातील २२ जून १९७० चा म्हणजे ४८...
डी.आर. कुलकर्णी यांचे निधनपुणे : 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीतील मुख्य उपसंपादक...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज जन्मदिन...भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 68 वा वाढदिवस...
देशात सर्वाधिक महाग पेट्रोल मराठवाड्यात...लातूर : गेली सलग अठरा दिवस देशात पेट्रोल आणि...