agriculture news in marathi, farmers companies to get fertilizer dealership | Agrowon

शेतकरी उत्पादक कंपन्यांना खताची डीलरशिप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम करण्यास केंद्र सरकारने सुरवात केली आहे. या कंपन्यांना खतविक्रीची डीलरशिप देण्याचादेखील निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या लघुकृषक व्यापार (एसएफएससी) संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंता चौधरी यांनी दिली. 

पुणे : देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी एफपीओ अर्थात शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम करण्यास केंद्र सरकारने सुरवात केली आहे. या कंपन्यांना खतविक्रीची डीलरशिप देण्याचादेखील निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या लघुकृषक व्यापार (एसएफएससी) संघाचे व्यवस्थापकीय संचालक सुमंता चौधरी यांनी दिली. 

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे शेतबाजारातील व्यवहार व व्यवसाय वाढविण्यासाठी पुण्यातील ‘यशदा’मध्ये आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र अॅग्री-बिझनेस कॉनक्लेव’मध्ये ते बोलत होते. या वेळी कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेचे एनआयआरडीचे महासंचालक डॉ. डब्ल्यू. आर. रेड्डी, महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक सुशील खोडवेकर, महाराष्ट्र राज्य पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार, आत्माचे संचालक सुभाष खेमनार, बॅंक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक बी. आर. पटेल, महाएफपीसीचे अध्यक्ष योगेश थोरात उपस्थित होते. 

श्री. चौधरी म्हणाले, ‘‘ग्रामीण व कृषी क्षेत्राच्या विकासात शेतकरी कंपन्या महत्त्वाच्या मानल्या गेल्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात तीन ठिकाणी शेतकरी कंपन्यांचा उल्लेख आहे. शेतकरी कंपन्यांना १०० कोटींपर्यंतच्या उलाढालीवर आयकर माफी दिली गेली आहे. याशिवाय केंद्राच्या ऑपरेशन ग्रीनमध्ये ५०० कोटींचा निधी मिळाला असून, त्यात शेतकरी कंपन्यांचे काम मध्यवर्ती असेल. या चळवळीला अजून चांगले स्वरूप देण्याकरिता शेतकरी उत्पादक कंपन्यांचे राष्ट्रीय संघटनासाठी ही परिषद घेतली जात आहे.’’ 

‘‘देशातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना खताची डीलरशिप देण्यासाठी केंद्रीय खत मंत्रालयाने आदेश काढला आहे. यातून कंपन्यांना व्यवसायवाढीसाठी चांगले साधन मिळेल. आनंदाची बाब म्हणजे शेतकरी कंपन्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी बॅंक ऑफ बडोदाशी करारदेखील होत आहे. तसेच, महाराष्ट्रातील शेतकरी कंपन्यांना भांडवली मदत मिळवून देण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना काही दिवसांत मंजुरी घेण्यात येईल,’’ अशा महत्त्वपूर्ण घोषणा श्री. चौधरी यांनी केल्या.

शेतकऱ्यांना स्वविकासासाठी कृषीसह आता अकृषक व्यवसाय आणि व्यापाराकडे वळावेच लागेल, असे राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्थेचे महासंचालक डॉ. डब्ल्यू. आर. रेड्डी यांनी नमूद केले. ते म्हणाले, की कृषी क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाच्या ग्रामीण भागाचा विकास होणार नाही. त्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका मोलाची राहील. १९७५ नंतर देशात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. वडिलोपार्जित जमिनीचे सतत वाटे पडत असल्यामुळे शेतीचे तुकडीकरण झपाट्याने होत आहे. या स्थितीत छोट्या शेतकऱ्यांनी समूहाने शेती व्यवसाय केल्याशिवाय प्रगती होणार नाही.  

या वेळी सह्याद्री एफपीसीचे प्रमुख विलास शिंदे, फळ-भाजीपाला असोसिएशनचे इकराम हुसैन, बिग बास्केटचे जयदीप सूर्यवंशी तसेच इतर शेतकरी कंपनी चळवळीबाबत मते मांडली. माजी अध्यक्ष श्रीराम गाढवे, तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. काही कंपन्यांनी आपल्या मालाची माहिती देणारे प्रदर्शन परिषदेच्या बाहेर आयोजित केले होते.

  शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आशादायक घडामोडी 

  • खताची डीलरशिप देण्यास केंद्रीय खत मंत्रालयाची मान्यता
  • महाबीज देणार बियाणे विक्रीची डीलरशिप
  • बडोदा बॅंकेकडून १२ कंपन्यांना तीन कोटींचे कर्ज मंजूर 
  • निर्यात प्रशिक्षणासाठी अपेडा-पणन मंडळाकडून प्रशिक्षण 
  • २० कंपन्यांना प्रत्येकी दहा लाखांचा भांडवली निधी 
  • राज्यातील १४०० कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न

इतर अॅग्रो विशेष
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक...पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता....
अतितीव्र हवामानस्थितीला कर्बाचे वाढते...पुणे : वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे (कर्ब)...
कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर...अलीकडे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता अधिक...
पिंप्री गावाने कमावले लसूणघास शेतीत नाव पिंप्री (वळण) (ता. राहुरी, जि. नगर) हे गाव मुळा...
दुष्काळातही सुरती हुरड्याची  चवच काही...औरंगाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील अरुण कडूबाळ...
। तुका म्हणे कान्हा । भूक लागली नयनां ।।देहू : तुकाराम तुकाराम...असा नामघोष आणि...
नांदेड जिल्ह्यात कापूस उत्पादकता...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ च्या खरीप...
नगरची लढत राहणार लक्षवेधीनगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (...
रब्बी पीकविम्याला बोगस प्रकरणांचे ग्रहणमुंबई ः २०१८-१९ च्या रब्बी हंगामात पंतप्रधान...
सहा कारखान्यांची धुराडी थंडावलीऔरंगाबाद  : मराठवाडा व खानदेशातील पाच...
बेदाण्याला दराची गोडीसांगली ः होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बेदाण्याची...
आनंदाचा उतरता आलेखजगभरातील आनंदी देशांचा अहवाल (वर्ल्ड हॅपीनेस...
आदित्यात् जायते वृष्टि:जगात एकूण १९५ देश आहेत, पण आकार, आर्थिक स्थिती,...
आज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे  : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...
उज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...
जल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व...
राज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...
जैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...