agriculture news in marathi, Farmers Companies to purchase agri products, Aurangabad, Maharashtra | Agrowon

औरंगाबादला शेतकरी कंपन्या उतरल्या शेतमाल खरेदीत
संतोष मुंढे
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ शेतकरी उत्पादक कंपन्या थेट शेतमाल खरेदीत उतरल्या असून मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ मकाचीही खरेदी या कंपन्यांनी सुरू केली आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आकार घेतला. जवळपास वीस गटांच्या माध्यमातून एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालना जिल्ह्यांतील १३ व बीड जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आठ शेतकरी उत्पादक कंपन्या थेट शेतमाल खरेदीत उतरल्या असून मूग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ मकाचीही खरेदी या कंपन्यांनी सुरू केली आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत ४० शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आकार घेतला. जवळपास वीस गटांच्या माध्यमातून एक शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यात आली. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३, जालना जिल्ह्यांतील १३ व बीड जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे.

यंदा औरंगाबाद जिल्ह्यातील खुल्ताबाद तालुक्‍यातील दोन, सिल्लोड व कन्नड तालुक्‍यांतील प्रत्येकी एका कंपनीने मकाच्या खरेदी सुरू केली आहे. जालना व भोकरदन तालुक्‍यातील प्रत्येकी दोन शेतकरी उत्पादक कंपन्या शेतमालाच्या खरेदीत उतरल्या आहेत. या कंपन्यांनी मूग, उडीद व सोयाबीनच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. गतवर्षी जालना जिल्ह्यातील रेवगावच्या जडाई माता व पूर्णा केळणा फार्मर प्रोड्युसर कंपनीने तूर खरेदीत सहभाग घेतला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील चारही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आजवर जवळपास साडेतीनशे टन मकाची खरेदी केल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. गतवर्षी औरंगाबाद जिल्ह्यातील सहा शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जवळपास १३७८ मेट्रिक टन तुरीची खरेदी केली होती. त्यामुळे या कंपन्यांची उलाढाल ६ कोटी ९४ लाख रुपयांवर पोचली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ शेतकरी उत्पादक कंपन्यांना दालमीलचे वाटप केले असून या कंपन्यांकडे ५० ते १०० क्‍विंटलची दाळ तयार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. बीड जिल्ह्यातील १४ शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी  गतवर्षीच्या तूर खरेदीत सहभाग घेतला होता. यंदा मात्र अजून कोणतीही शेतकरी उत्पादक कंपनी खरेदीत पुढे आली नसल्याची माहिती आत्माच्या वतीने देण्यात आली. 

इतर अॅग्रो विशेष
भारतातील १ टक्का श्रीमंतांकडे ७३ टक्के...दावोस  ः गेल्या वर्षभरात देशात निर्माण...
किमान तापमानात घट; नगर ९.४ अंशांवरपुणे ः विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात...
नागपुरात तुरीच्या दरात घसरणनागपूर : येथील कळमणा बाजारात आठवड्याच्या...
देशात खालावत आहे जमिनीचे आरोग्यनागपूर : खोल मशागत, नियंत्रित खत व्यवस्थापनाला...
बोंड अळी भरपाईसाठी सुनावणी आजपासूनपुणे : राज्यात शेंदरी बोंड अळीमुळे...
तूर खरेदी अडकली नोंदणीतचलातूर ः तेलंगणा, कर्नाटक राज्याने हमीभावाप्रमाणे...
कष्ट, अभ्यासातून जोपासलेली देवरेंची...नाशिक जिल्ह्यातील नाशिक सटाणा तालुक्याचा परिसर...
लसीकरणाअभावी दाेन काेटी पशुधनाचे...पुणे ः सुमारे ३० काेटींची निविदा मिळविण्यासाठी...
सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल...सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर...
जिरायती शेती विकासातून थांबेल स्थलांतरमराठवाडा आणि विदर्भ विभागातील जिरायती शेतकरी...
संभ्रम दूर करामागील खरीप हंगामात चांगल्या पाऊसमानाच्या...
मुद्रा योजनेच्या १० लाखांपर्यंतच्या...कोल्हापूर : तरुणांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर...
रब्बीचा ६१.८ दशलक्ष हेक्टरवर पेरानवी दिल्ली ः भारतातील रब्बी क्षेत्रात यंदा गेल्या...
प्रशिक्षणांना दांड्या मारणाऱ्या...अकोला : अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता...
ठिबक अनुदानासाठी ७६४ कोटींचा निधीपुणे: राज्यात ठिबक संच बसविलेल्या शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात ४३ टक्‍के जमीन चुनखडऔरंगाबाद : मराठवाड्यातील जमिनीचा पोत दिवसेंदिवस...
दशकातील सर्वांत मोठ्या कापूस आयातीचे...जळगाव ः महाराष्ट्रासह काही प्रमुख कापूस उत्पादक...
कांदा निर्यात मूल्यात १५० डॉलरने कपातनवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्यावरील...
जमीन आरोग्यपत्रिकांसाठी एप्रिलपासून '...पुणे ः महाराष्ट्रात सुरू असलेल्या जमीन...
फक्त फळ तुमचे, बाकी सारे मातीचे..! नैसर्गिक शेतीचे प्रणेते म्हणून संपूर्ण...