agriculture news in marathi, farmers companies in satara district take initiatives in agri marketing | Agrowon

सातारा जिल्ह्यात शेतकरी कंपन्यांकडून फळे, भाजीपाला पॅकिंग, विक्री
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

सातारा : शेतकरी ते ग्राहक या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात ११ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकरी एकत्र आले आहेत, त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल, तर शेतकऱ्यांच्या शेतीमालास वाजवी किंमत मिळण्यास मदत होऊ लागली आहे.

सातारा : शेतकरी ते ग्राहक या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात ११ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या कंपन्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकरी एकत्र आले आहेत, त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल, तर शेतकऱ्यांच्या शेतीमालास वाजवी किंमत मिळण्यास मदत होऊ लागली आहे.

शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यात २०१३ मध्ये शेतकरी कंपन्या स्थापन करण्यास सुरवात झाली. तीन वर्षांत शेतकरी कंपन्या स्थापन करून त्या सक्षम करण्यासाठी शासनामार्फत आर्थिक मदत केली जाणार आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ११ शेतकरी कंपन्याची स्थापना करण्यात आली आहे. तत्कालीन कृषी पणन तज्ज्ञ सायली महाडीक यांनी कंपन्या स्थापनेसाठी विशेष प्रयत्न केले होते.

यामधील तीन शेतकरी कंपन्या चांगल्या प्रमाणात काम सुरू झाले असून, उर्वरित कंपन्याची गती येण्यासाठी आत्मा व एमएसीपीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या कंपन्याच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रत्येक वर्षी खरेदीदार विक्रेता संमेलनाचे अयोजन करण्यात येते. यातून अनेक करार झाल्यामुळे कंपन्यांना गती येण्यास मदत झाली आहे. केडंबे येथील वेण्णा वॅली शेतकरी कंपनीकडून स्ट्रॉबेरीची प्रतवारी, पॅकिंग करून थेट विक्री केली जात आहे. फंरादवाडी येथील कृषी क्रांती या शेतकरी कंपन्याकडून धान्याची प्रतवारी तर गिरवी येथील गोपल कृष्ण शेतकरी कंपनी डांळिब विक्री व भाजीपाला पॅकिंग करून विक्री केली जात आहे.

उर्वरित कंपन्यांनी गती घेणे गरजेचे
११ पैकी तीन कंपन्यांना अग्रेसर झाल्या आहेत. कंपन्याच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात संघटित होत आहेत. या संघटित शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या संचालक तसेच कृषी विभागाकडून अग्रेसर होण्याची गरज आहे.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...