agriculture news in marathi, Farmers companies will be established for Village development | Agrowon

गावांच्या विकासासाठी कंपनी स्थापन करणार : सहकारमंत्री सुभाष देशमुख
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

सोलापूर : गावाच्या सहभागाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील गावांचा विकास करण्यासाठी कंपनी स्थापन करणार आहे. त्यामध्ये ५० टक्के वाटा गावाचा व ५० टक्के त्या कंपनीचा असेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

सोलापूर : गावाच्या सहभागाच्या माध्यमातून गावाचा विकास करण्यासाठी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील गावांचा विकास करण्यासाठी कंपनी स्थापन करणार आहे. त्यामध्ये ५० टक्के वाटा गावाचा व ५० टक्के त्या कंपनीचा असेल, असे प्रतिपादन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले. 

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्‍यातील नवीन सरपंच व सदस्यांसाठी आयोजिलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते. या वेळी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या सभापती संध्याराणी पवार, दक्षिण सोलापूरच्या सभापती ताराबाई पाटील, गणेश शिंदे, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, स्वरूपाराणी मोहिते-पाटील, उषा सुरवसे, शैला गोडसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्‍वर राऊत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार उपस्थित होते. 

श्री. देशमुख म्हणाले, "गावाच्या विकासात गावाचे योगदान ५० टक्के असायलाच हवे. उर्वरित ५० टक्के या कंपनीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. या कंपनीच्या माध्यमातून राज्यात काही गावे मॉडेल करण्याचा विचार सरकारचा आहे. त्यासाठी गावांनीही सहकार्य करावे. त्यात सरकार मदत करेल.’’

श्री. पवार म्हणाले, "सरपंच, ग्रामसेवक व ग्रामसभा एकत्र आल्यास गाव सक्षम होण्यास वेळ लागणार नाही. गुत्तेदार म्हणून गावचा विकास करण्यासाठी सरपंच होऊ नका. प्रामाणिक राहा, गावाच्या प्रत्येक कामात सक्रिय सहभाग द्या, एकोपा ठेवा आपोआप कामे आणि गावाचा विकासही होईल.''

इतर ताज्या घडामोडी
काकडी, दोडका, कारल्याच्या दरात सुधारणापुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
‘गिरणा‘च्या पाण्यासाठी वाळूचा बंधाराजळगाव : गिरणा नदीतून पिण्यासह शेतीच्या पाण्याचे...
‘समृद्धी’च्या उभारणीसाठी रॉयल्टीत देणार...नाशिक   : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या...
व्याजासह एफआरपी दिल्याशिवाय...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी थकीत...
कोल्हापुरात पहिल्या टप्प्यात गूळदरात वाढकोल्हापूर  ः यंदाच्या गूळ हंगामाला सुरवात...
सरुड येथील गुऱ्हाळघरमालक उसाला देणार...कोल्हापूर : गुऱ्हाळघर व्यवसायात व्यावसायिकपणा...
नगर जिल्ह्यात १७८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यात यंदा गंभीर पाणीटंचाई जाणवत...
पुणे बाजार समितीत हापूस आंब्यांची आवकपुणे  ः कोकणातील हापूस आंब्यांची या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात...
नागपूर जिल्ह्यात रब्बीची २१ टक्के पेरणीनागपूर   ः पाणी उपलब्धतेची अडचण, जमिनीत...
राज्यकर्ते दूध भेसळ का थांबवत नाहीत :...पुणे : राज्यात राजरोस दुधात भेसळ सुरू असून, अन्न...
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...