शेतकरी कापूस न विकता गाठी विकणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

वाशीम : शेतकऱ्यांनी या हंगामात पिकवलेला कापूस थेट न विकता त्याच्या गाठी बनवून विकण्याचा प्रयोग करण्याचे मानोरा तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनीच्या पुढाकाराने ठरविण्यात आले आहे.

या फुलउमरी येथे अनुषंगाने गुरुवारी (ता.२१) एमसीएस, संस्कार वाहिनी, आत्मा व फुलउमरी फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या संचालक, सदस्यांची बैठक झाली.  या वेळी एमसीएसच्या दक्षा जानी, संस्कार वाहिनीचे श्री. सिरसाट, मानोरा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) पंकज कडू, शेतकरी कंपनीचे अध्यक्ष युवराज राठोड, उपाध्यक्ष जगन राठोड, सचिव संजीव राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

मानोरा तालुक्यात कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. शेतकरी कापूस पिकवतात. परंतु, तो तसाच विकल्या जात असल्याने भाव कमी मिळतो. यामुळे एमसीएस, आत्माच्या पुढाकाराने प्रक्रिया केलेल्या कापूस गाठी विकण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.

यासाठी शेतकरी कंपनीच्या सदस्य असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये करार करण्यात आला आहे. उत्पादीत केलेला कापूस मानोरा येथील एका जिनिंग प्रेसिंगमध्ये प्रक्रिया करून गाठी तयार केल्या जातील, अशी माहिती युवराज राठोड यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com