agriculture news in marathi, Farmers in crises due to ballworm in BT cottion, Ner, Yavatmal, Maharashtra | Agrowon

साहेब, निकृष्ट बियाण्याने आमचा घात केला बघा !
सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

नेर, जि. यवतमाळ : साहेब, निकृष्ट दर्जाच्या बियाण्याने आमचा घात केला बघा; आम्हाला नुकसानीची भरपाई द्या, नाहीतर शेतकऱ्यांचं जगणं अवघड होईल, असे म्हणत मांगलादेवी (ता. नेर) येथील रामभाऊ दहापुते यांनी आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. 

नेर, जि. यवतमाळ : साहेब, निकृष्ट दर्जाच्या बियाण्याने आमचा घात केला बघा; आम्हाला नुकसानीची भरपाई द्या, नाहीतर शेतकऱ्यांचं जगणं अवघड होईल, असे म्हणत मांगलादेवी (ता. नेर) येथील रामभाऊ दहापुते यांनी आपल्या आसवांना वाट मोकळी करून दिली. 

नेर तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये निकृष्ट दर्जाच्या बी. टी. बियाण्यामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढीस लागल्याचा आरोप आहे. रविवारी (ता. २९) महसूल राज्यमंत्री संजय राठोड, अमरावती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, प्रमोद यादगीरवार यांनी भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या भावना या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. 

रामभाऊ दहापुते यांच्या संपूर्ण तीन एकरातील कपाशी पिकातील बोंड प्रादुर्भावग्रस्त आहेत. एक क्‍विंटल उत्पादकतेचीही शक्‍यता नाही. त्यामुळे डोक्‍यावरच्या कर्जाची परतफेड, घरखर्च भागविण्यासाठीच्या पैशाची सोय, वैद्यकीय खर्च आणि इतर कामांसाठी लागणारा पैसा कोठून आणावा? या विवंचनेत ते आहेत. तीन एकर क्षेत्रातील कोणतेही बोंड घ्या ते किडरोगग्रस्त नसेल तर एक लाख रुपये देऊ, असे ते खिन्नपणे म्हणाले. शासनाने या भागातील नुकसानीची दखल घेत मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. शासन मदत देण्यास असमर्थ असेल तर शेतकऱ्यांनी कस जगावं, असे म्हणत त्यांनी आसवांना वाट मोकळी केली. 

नेर तालुक्‍यातील चिखली, कान्होबा, टाकळी सलामी, मांगूळ, लोनाडी, पिंपळगाव या गावात बोंडअळीमुळे उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. 

एक ट्रॉली खराब बोंड 
संगीता श्रीराम ढबाले (शिरजगाव रा. पांढरी) या महिला शेतकरी थेट थैलीत (पिशवीत) बोंड घेऊन पोचल्या. एक ट्रॉलीभर प्रादुर्भावग्रस्त बोंड तोडून शेताबाहेर त्यांनी ढीग लावला आहे. महसूल राज्यमंत्री व कृषी तज्ज्ञांनी आपल्या शेतालादेखील भेट द्यावी याकरीता थेट पिशवीत बोंड भरून त्या मांगलादेवी येथे पोचल्या. त्यांनीदेखील आपली व्यथा यावेळी अधिकाऱ्यांसमोर मांडली. निकृष्ट बी.टी. बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कारवाईची मागणी यावेळी संगीता ढबाले यांनी केली. 

इतर अॅग्रो विशेष
कुटुंब एेवजी व्यक्ती घटक माणून कर्जमाफी...नागपूर : "शेतकरी सन्मान योजने" साठी आता कुटुंब...
सर्व इथेनॉल खरेदीची केंद्र शासनाची...नागपूर : अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला...
गनिमी काव्याने ‘जाम’पुणे: दूध उत्पादकांनी गनिमी कावा करत राज्यभरात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर...पुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
`एफआरपी`चे कारखाने संघाकडून स्वागतपुणे : साखर कारखाने अडचणीत असतानाही एफआरपीमध्ये...
पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या...
सेंद्रिय ऊस, हळद, खपली गव्हाला मिळवली...सांगली जिल्ह्यातील आरग येथील जयकुमार अण्णासो...
दूध पावडर बनली आंदोलनाची ठिणगीपुणे : राज्यातील दूध आंदोलनाला दूध पावडरची समस्या...
दूधाला २५ रुपये दर; आंदोलन मागेनागपूर : गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रति लिटर...
होले झाले कलिंगड, खरबुजातील ‘मास्टर’पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या...
शेतकरी केंद्रस्थानी ठेवून आखावी धोरणे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशातील शेतकरी,...
‘निधी’चे सिंचनसर्वाधिक धरणांची संख्या असलेल्या आपल्या राज्याचा...
पेरूसाठी अतिघन लागवड पद्धत उपयुक्तपेरू हे फळझाड व्यापारीदृष्ट्या फार महत्त्वाचे...
ऊस ‘एफआरपी’त २०० रुपये वाढनवी दिल्ली ः ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी ‘...
स्वाभिमानीचा आज ‘चक्का जाम’पुणे: दुधासाठी शेतकऱ्यांना थेट पाच रुपये अनुदान...
पावसाचा जोर आेसरलापुणे : राज्यात सुरू असलेल्या पावसाचा जोर बुधवारी...
शेतमालाच्या रस्ते, जहाज वाहतुकीसाठी...पुणे ः शेतमालाला देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध...
राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडाजळगाव ः राज्यात निर्यातक्षम केळीचा तुटवडा निर्माण...
हमीभाववाढीने २०० अब्ज रुपयांचा भारनवी दिल्ली : केंद्र सरकारने खरिपातील १४ पिकांच्या...
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू...