सावकारग्रस्त शेतकरी संघटनेची उद्या बैठक

सावकारग्रस्त शेतकरी संघटनेची शुक्रवारी बैठक
सावकारग्रस्त शेतकरी संघटनेची शुक्रवारी बैठक

अकोला : परवानाधारक सावकारी कर्जमाफीतील अपात्र कर्जदार शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चेसाठी सावकारग्रस्त शेतकरी समितीची शुक्रवारी (ता. २४) अकोल्यात बैठक अायोजित करण्यात अाली अाहे. विश्रामभवन परिसरात दुपारी एक वाजता बैठक होणार अाहे.     शासनाने २०१४ मध्ये १९ जिल्ह्यांतील परवानाधारक सावकारी कर्जमाफी योजनेची घोषणा केली. ही कर्जमाफी योजना कार्यक्षेत्राच्या तांत्रिक अडचणीत अडकलेली असून, तीन वर्षे लोटली तरी अकोला जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना अपात्र ठरविल्याने त्यांना लाभ मिळाला नाही. त्यावर सावकारग्रस्त समितीने नागपूर खंडपीठात जनहित याचिकाही दाखल होती. यावर न्यायालयाने शेतकऱ्यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवू नका, असे २० सप्टेंबरच्या निकालात म्हटले. त्याला दोन महिने लोटले असून, अपात्र ठरविलेल्यांबाबत काहीही झालेले नाही. याबाबत उपरोक्त बैठकीत चर्चा केली जाणार अाहे.  बैठकीला शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे अावाहन प्रदेशाध्यक्ष अरुण इंगळे, जिल्हाध्यक्ष फुलचंद पाटील, उपाध्यक्ष महेंद्र इंगळे यांनी केले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com