agriculture news in marathi, Farmers cultivate maize cultivation in Yeola area | Agrowon

येवला भागात शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 जून 2018

येवला, जि. नाशिक  : खरीप हंगामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आभाळाकडे आशाळभूतपणे नजरा लावून बसलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचक्र तालुक्यातील दमदार पावसामुळे पुढे सरकणार आहे. मृग नक्षत्राने शेवटच्या तीन दिवसांत थोडाफार दिलासा दिल्यानंतर ''आर्द्रा'' नक्षत्राच्या दमदार पर्जन्यधारा बरसल्याने तालुक्यातील बळिराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, यंदाच्या खरिपाच्या पेरणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल हा पिवळे सोने समजल्या जाणाऱ्या मकाकडे दिसत आहे.

येवला, जि. नाशिक  : खरीप हंगामाचा श्रीगणेशा करण्यासाठी आभाळाकडे आशाळभूतपणे नजरा लावून बसलेल्या येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतीचक्र तालुक्यातील दमदार पावसामुळे पुढे सरकणार आहे. मृग नक्षत्राने शेवटच्या तीन दिवसांत थोडाफार दिलासा दिल्यानंतर ''आर्द्रा'' नक्षत्राच्या दमदार पर्जन्यधारा बरसल्याने तालुक्यातील बळिराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, यंदाच्या खरिपाच्या पेरणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल हा पिवळे सोने समजल्या जाणाऱ्या मकाकडे दिसत आहे.

तालुक्यातील बी-बियाणे विक्रीची सर्वच दुकाने गेल्या चार ते पाच दिवसांत गजबजून गेली आहेत.  बियाणे खरेदीच्या अंदाजानुसार, यंदाच्या खरिपाच्या पेरणीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल मकाकडे आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामामध्ये पेरणीसाठी सर्वाधिक मागणी असलेल्या कपाशीला बोंड अळीच्या भीतीमुळे यंदा फटका बसल्याचे दिसत आहे. मागणी घटल्याने यंदा कपाशी तिसऱ्या स्थानावर फेकली गेली आहे.

यंदाच्या खरिपासाठी कपाशीची पीछेहाट होताना मक्याने बाजी मारली आहे. गेल्या वर्षी मकास स्थिर बाजारभाव होता. त्यामुळे  शेतकऱ्यांचा यंदाच्या हंगामात मका लागवडीकडे अधिक कल दिसत आहे. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांची सोयाबीन बियाण्याला मागणी आहे. बियाणे खरेदीबाबत कपाशी तिसऱ्या स्थानी असून, त्यानंतर शेतकऱ्यांची मूग, उडीद, तूर व बाजरीला मागणी आहे.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...
सोलापुरात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस...