agriculture news in marathi, Farmer's daughter became production fee inspector | Agrowon

शेतकरी कन्या झाली उत्पादन शुल्क निरीक्षक
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 जानेवारी 2018

यवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न आज अनेक जण करताना दिसतात. दिग्रस तालुक्‍यातील बेलोरा येथील शेतकऱ्याच्या मुलीनेही बी. ई. झाल्यानंतर खासगी कंपन्यांतील नोकरीच्या मागे न लागता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

यवतमाळ : इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न आज अनेक जण करताना दिसतात. दिग्रस तालुक्‍यातील बेलोरा येथील शेतकऱ्याच्या मुलीनेही बी. ई. झाल्यानंतर खासगी कंपन्यांतील नोकरीच्या मागे न लागता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले.

तालुक्‍यातील बेलोरा येथील राजकुमार वानखडे यांची कन्या स्वाती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. ती पीएसआय, विक्रीकर इन्स्पेक्‍टर व उत्पादन शुल्क निरीक्षक या तिन्ही विभागांतील अधिकारी पदासाठी पात्र ठरली आहे. तिचे वडील शेतकरी आहेत. आई संध्या वानखडे गृहिणी आहे. त्या दोघांचेही शिक्षण दहावीपर्यंत झाले. त्यांनी मुलांची शिक्षणातील आवड बघून त्यांचे भविष्य सुखमय व्हावे म्हणून पोटाला चिमटा काढून मुलांना शिकविले. वेळप्रसंगी शेतीचा तुकडा विकून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मुलांनीही आई-वडिलांच्या विश्‍वासाला तडा जाऊ न देता परिश्रमपूर्वक शिक्षण पूर्ण केले. नोकरीला लागले.

मोठा मुलगा सागर ग्रामसेवक म्हणून दारव्हा पंचायत समितीत कार्यरत आहे. तर लहान मुलगा विशाल एमबीए करून पुण्यातील कंपनीत नोकरीला आहे. मुलगी स्वातीने तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय, विक्रीकर इन्स्पेक्‍टर व उत्पादन शुल्क निरीक्षक या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण करून आई-वडिलांसह भावंडांनाही सुखद धक्काच दिला आहे. विशेष म्हणजे फावल्या वेळात तिने तलाठ्याची परीक्षा उत्तीर्ण करून नोकरी केली.

सोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाली. तिचे बारावीपर्यंतचे शिक्षण दिग्रस येथेच झाले. इंजिनिअरिंग कॉलेज नांदेड येथून तिने बी.ई.ची पदवी प्राप्त केली. येथील बुटले महाविद्यालयातील वाचनालयात तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलीने शिक्षणात घवघवीत यश प्राप्त करून इतरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. ती लवकरच उत्पादन शुल्क निरीक्षक म्हणून रुजू होणार आहे. तिचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

इतर ताज्या घडामोडी
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला चैत्री...सोलापूर : गेल्या आठवड्यात झालेल्या चैत्री...
अकोला जगात ‘हॉट’ शहरांच्या यादीतअकोला : मागील दोन दिवसांपासून या भागात उष्णतेचे...
दुष्काळी भागात दाहकता वाढलीसावळज, जि. सांगली : कायमस्वरूपी दुष्काळी भाग...
विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या :...नाशिक : लोकसभेची ही निवडणूक विकासाची, सामान्य...
राहुल गांधी यांची आज संगमनेरात सभानगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काॅँग्रेसचे...
तयार करा सेंद्रिय निविष्ठाअलीकडे सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची...
रताळे लागवडरताळी लागवडीसाठी जमीन साधारण उतार असलेली व उत्तम...
निवडणूक संपली, आता तरी दुष्काळी...सांगली ः लोकसभेची आचारसंहिता एक महिन्यापासून सुरू...
चौथ्या टप्प्यात १०९ कोट्यधीश उमेदवार...मुंबई ः राज्यातील चौथ्या टप्प्याची निवडणूक...
पुणे ः खरिपासाठी एक लाख ८५ हजार टन...पुणे ः पुणे जिल्ह्यात खरीप हंगामाची तयारी सुरू...
राज्यात कलिंगड प्रतिक्विंटल ५०० ते २१००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते ११०० रुपये अकोला ः...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, उन्हाळी भुईमूग...हवामान अंदाज - शुक्रवार - शनिवारी (ता. २६ - २७)...
द्राक्ष बागेचे वाढत्या तापमानातील...नव्या आणि जुन्या द्राक्ष बागांचा विचार केला असता...
ऑस्ट्रेलियातील सुपरमार्केटची दुष्काळाशी...ऑस्ट्रेलियातील एका सुपर मार्केटने दुष्काळाशी...
गोदावरीत प्रदूषण केल्यास होणार कारवाईनाशिक : नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी...
सोलापुरात टंचाई निवारणाचा भार...सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग...
खानदेशात पपईला उन्हासह पाणीटंचाईचा फटकानंदुरबार : खानदेशात या हंगामात पपई लागवड कमी...
जळगावात पांढऱ्या कांद्याच्या आवकेत घटजळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सांगली बाजारसमितीत हळद, गुळाची उलाढाल ...सांगली ः व्यापाऱ्यांना सेवाकराच्या नोटिसा...
नगर जिल्ह्यात छावण्यांवर दर दिवसाला...नगर  : नगर जिल्ह्यामध्ये दुष्काळात पशुधन...