agriculture news in marathi, farmers debt waiver issue Continuous | Agrowon

कर्जमाफीचा घोळ संपता संपेना
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जानेवारी 2018

जळगाव : जिल्ह्यात दोन लाख ४७ हजारांपेक्षा अधिक कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. यातील निम्मे लाभार्थींनाही लाभ मिळालेला नसून, आता पुन्हा सात हजार संभाव्य लाभार्थींची यादी दुरुस्तीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली आहे.

जळगाव : जिल्ह्यात दोन लाख ४७ हजारांपेक्षा अधिक कर्जमाफीचे लाभार्थी आहेत. यातील निम्मे लाभार्थींनाही लाभ मिळालेला नसून, आता पुन्हा सात हजार संभाव्य लाभार्थींची यादी दुरुस्तीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे आली आहे.

दुरुस्तीसाठी आणखी एक महिना लागेल की दोन महिने, असा मुद्दा आहे. कर्जमाफीचा घोळ वाढतच असून, रोज नव्या त्रुटी व नव्या तक्रारी येत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात जळगाव तालुक्‍यात मध्यंतरी लाभार्थींची ग्रीन यादी आली. त्यात धानवड (ता.जि.जळगाव) येथील चार शेतकऱ्यांची दुबार नावे आली. म्हणजेच यापूर्वी ज्यांना लाभ मिळाला, त्यांची नावे पुन्हा आली. अशातच अलीकडेच सात हजार संभाव्य लाभार्थींची ''यलो'' यादी आली असून, त्यासंबंधी दुबार नावे वगळण्याची कार्यवाही करून दुरुस्ती करावी लागणार आहे. यासाठी महिनाभर वेळ लागतो की अधिक हादेखील मुद्दा आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयास त्यासाठी कार्यवाही करावी लागणार असून, सुनावण्या घ्याव्या लागतील. सुनावणीसाठी संभाव्य लाभार्थी शेतकरी व बॅंकेलाही बोलावले जाईल. लाभार्थी यादीत दुबार नावे दोन ते तीन बॅंकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची येत आहेत. एका शेतकऱ्याला दोनदा लाभ मिळू नये म्हणून सुनावण्या व दुरुस्ती ही सर्कस करावी लागणार आहे.

नियमित लाभार्थी प्रतीक्षेत
जिल्हा बॅंकेचे कर्जदार लाभार्थी अधिक असून, सध्या अनेक नियमित कर्जदार लाभार्थी २५ टक्के सवलतीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी सर्वप्रथम ऑनलाइन अर्ज भरले, त्यांचीच नावे ग्रीन यादीत आलेली नसल्याची माहिती मिळाली.

कर्मचारी सुटीलाही कामावर

कर्जमाफीच्या घोळात मागील दोन महिन्यांत जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखा परीक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना दुसरा व चौथा शनिवार आणि रविवारची सुटीही मिळालेली नाही. फक्त दिवाळीलाच त्यांना सुट्या होत्या. अशातच मध्यंतरी एका सहायक निबंधकाला कामाच्या ताणामुळे हृदयविकाराचा झटका आला होता, असे सूत्रांनी सांगितले.

कर्जमाफीचा लाभ जळगाव जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक शेतकऱ्यांना मिळाला आहे. डोळ्यात तेल घालून यासंबंधीचे काम करावे लागत आहे. दुबार लाभार्थी वगळण्यासाठी सुनावण्या घ्याव्या लागणार आहेत.
- अशोक बागल,
प्रभारी सहायक जिल्हा उपनिबंधक, जळगाव

इतर बातम्या
मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे ः पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण,...
जॉईंट अॅग्रेस्को : ‘कृषी’च्या मंथनाकडे...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या आत्महत्या...
साताऱ्यात एक कोटी सात लाख क्विंटल साखर...सातारा : जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांच्या...
चार जिल्ह्यांत हरभरा खरेदीला ग्रहणऔरंगाबाद : खरेदीत सातत्य नसणे, जागेचा प्रश्‍न आणि...
हंगाम तोंडावर; पीककर्जाची प्रतीक्षा...अकोला ः  खरीप हंगाम अवघा काही दिवसांवर आला...
गोष्ट अश्‍वमेधाच्या डिजिटल घोड्यांचीनरेंद्र मोदी देशाच्या राजकारणात उतरले तेच मुळी...
विवेकबुद्धी, स्वयंप्रेरणाच बनली धूसरमोदी सरकारच्या काळात हिंदुत्व आणि नरम हिंदुत्व...
मोदी सरकार चार वर्ष : अपेक्षा...गेल्या चार वर्षांत नरेंद्र मोदी सरकारला अनेक चढ-...
माॅन्सून अंदमानात दाखल !!!पुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
पावसाने ओढ दिल्यास योग्य नियोजन करावेपुणे  ः यंदा पावसाचा चांगला अंदाज व्यक्त...
'यंदाच साल बरं राहिलं' या आशेवर खरिपाची...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी खरिपाच्या अंतिम...
बुलडाण्यात यंदाही सोयाबीनवरच जोर राहणारअकोला : गेल्या हंगामात पाऊस व कीड रोगांनी...
नामपूर बाजार समिती निवडणुकीचा प्रचार...नामपूर, जि. नाशिक : येथील नामपूर कृषी उत्पन्न...
कर्जमाफी अर्जातील दुरुस्तीच होईना...पुणे : कर्जमाफीसाठीच्या मुदतवाढीची संधी...
उष्ण वातावरणामुळे केळीबागा संकटातअकोला  ः सतत ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान राहत...
द्राक्षाला वर्षभरासाठी विमा सुरू...सांगली ः एप्रिल छाटणी म्हणजेच खरड छाटणीनंतर...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...